विश्वाच्या निर्मितीसह वैश्विक चुंबकत्वाचे गूढ रहस्य उलगडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी (एसकेएओ) या दोन मोठ्या रेडिओ दुर्बीण बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातंर्गत २०२९पर्यंत दक्षिण आफ्रिकेत ‘एसके मीड’ आणि ऑस्ट्रेलियात ‘एसके लो’ अशा दोन दुर्बीणी बांधण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १२ देश एकत्रित आले असून त्यात आता भारताचाही समावेश आहे.