National Supercomputing Mission : भारताला मिळणार आणखी नऊ सुपरकम्प्युटर! मोदी सरकारकडून 14 हजार कोटींची तरतूद

Digital Indian : पंतप्रधान मोदींनी 2015 साली 'डिजिटल इंडिया' अभियान सुरू केलं होतं. याचाच एक भाग म्हणजे, नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशन.
National Supercomputing Mission
National Supercomputing MissioneSakal
Updated on

Indian Supercomputers : नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनला मोठा बूस्ट मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी आणखी 9 सुपरकम्प्युटर मागवण्यासाठी मंजूरी दिली आहे. यासाठी 14,903 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे देशातील सुपरकम्प्युटर्सची संख्या वाढणार आहे.

पंतप्रधान मोदींनी 2015 साली डिजिटल इंडिया अभियान सुरू केलं होतं. या अभियानामध्येच नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनचाही समावेश होता. देशात 70 सुपरकम्प्युटर इन्स्टॉल करण्याची मंजूरी यामध्ये देण्यात आली होती.

National Supercomputing Mission
Supercomputer: आता होणार हवामानाची अचूक भविष्यवाणी; भारतात येणार 900 कोटींचे सुपर कम्प्युटर!

काय असतात सुपरकम्प्युटर?

सुपर कम्प्युटर हे साधारण कम्प्युटरच्या तुलनेत अतिशय फास्ट आणि प्रगत असतात. अगदी कठीण कॅल्क्युलेशन किंवा गणिती प्रक्रिया काही सेकंदांमध्येच करण्याची क्षमता यामध्ये असते. क्वांटम मेकॅनिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रिसर्च, हवामानाची माहिती, मॉलिक्यूलर मॉड्यूलिंग, न्यूक्लिअर फ्युजन रिसर्च आणि मेडिकल रिसर्च अशा कित्येक क्षेत्रांमध्ये याचा फायदा होतो.

देशातील सर्वात फास्ट सुपरकम्प्युटर

देशातील सर्वात वेगवान सुपरकम्प्युटर सध्या पुण्यात आहे. ऐरावत (AIRAWAT) नावाचा हा सुपर कम्प्युटर पुण्यातील डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग (C-Dac) याठिकाणी हा कम्प्युटर ठेवण्यात आला आहे. भारताकडे एकूण 18 सुपरकम्प्युटर आहेत. यामध्ये परम सिद्धी (PARAM Siddhi), प्रत्यूष (Pratyush) आणि मिहिर (Mihir) यांचा समावेश आहे.

National Supercomputing Mission
मोदी सरकारचा मोठा निर्णय! 100 शहरांमध्ये धावणार 10 हजार इलेक्ट्रिक बस; केंद्र देणार निधी

दरम्यान, अमेरिकेकडे जगातील सर्वात वेगवान सुपरकम्प्युटर आहे. ओकरिज नॅशनल लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या या कम्प्युटरचं नाव फ्रंटीयर (Frontier) असं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.