SpaceX Dragon Training : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांनी पूर्ण केली SpaceX ड्रॅगनची पहिली टेस्ट, नेमकं काय होतं खास? पाहा

Indian Air Force Officer Astronaut Shubhanshu Shukla SpaceX Dragon Training for ISS Mission : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये प्रवेश करत अंतराळात ऐतिहासिक सफरीकडे पहिले पाऊल टाकले आहे.
SpaceX Dragon First Test
SpaceX Dragon Training IAF Officer Shubhanshu Shuklaesakal
Updated on

SpaceX Dragon Test : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये प्रवेश करत अंतराळात ऐतिहासिक सफरीकडे पहिले पाऊल टाकले आहे. अ‍ॅक्सिओम स्पेसच्या Ax-4 मोहिमेचा भाग असलेल्या शुक्ला यांनी या मोहिमेचा प्रारंभ करत अंतराळ प्रवासासाठी अत्यावश्यक चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पेसएक्स मुख्यालयाला भेट देऊन स्पेससूटच्या मोजमापांपासून ते प्रेशरायझेशन चाचण्या पार पाडल्या आहेत. या चाचण्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या प्रवासादरम्यानच्या आरामदायी प्रवासाची खात्री करतात. नासाच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन या Ax-4 मोहिमेचं नेतृत्व करत असून त्यांनी या मोहिमेच्या प्रशिक्षणाला अधिकृतपणे सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत शुक्ला (Shubhanshu Shukla) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या अद्ययावत प्रणालीशी परिचित करून देण्यात आले आहे.

SpaceX Dragon First Test
Sunita Williams Latest Update : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्ससाठी धोका वाढला? स्पेस स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर हवा गळती सुरू

हे स्पेसक्राफ्ट आयएसएस (आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक) पर्यंत प्रवास करताना संशोधन आणि प्रयोगांसाठी विशेषतः डिझाइन करण्यात आले आहे. शुक्ला यांना या मोहिमेदरम्यान आयएसएसवर १० दिवस राहून विविध वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधन कार्य करायचे आहे.

अ‍ॅक्सिओम स्पेसच्या मोहिमा हे व्यावसायिक अंतराळ प्रवासाच्या नव्या युगाचे प्रतीक आहेत. या मोहिमांमुळे अंतराळवीर नसणारे व्यक्ती आणि संशोधकांना आयएसएसच्या मायक्रोग्रॅव्हिटी वातावरणात काम करण्याची संधी मिळते.

SpaceX Dragon First Test
ISRO Chief ISS Mission : कॅप्टन शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकावर कोणते संशोधन करणार? इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांनी दिलं उत्तर

Ax-4 ही स्पेसएक्स आणि नासा यांच्या भागीदारीतून अ‍ॅक्सिओम स्पेसची चौथी अशी महत्त्वाकांक्षी मोहीम आहे.(SpaceX Dragon Training)

नासा २०२५ पर्यंत ड्रॅगन स्पेसक्राफ्टचा वापर सुरू ठेवणार आहे, कारण बोईंग स्टारलाइनरमध्ये अद्याप दुरुस्तीची गरज आहे. दरम्यान, शुक्ला आणि त्यांचे सहकारी ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आणि आयएसएसच्या प्रणालींबद्दल अधिकाधिक माहिती मिळवत आपले प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.