Spike ATGM : इस्रायलचं शक्तिशाली क्षेपणास्त्र वाढवणार भारतीय वायुसेनेची ताकद! कशी आहे 'स्पाईक' मिसाईल?

Air Force : भरपूर उंचावर असणारे शत्रूचे टँक आणि इतर वाहनांना टार्गेट करण्यासाठी या मिसाईलचा वापर होईल.
Spike ATGM Indian Army
Spike ATGM Indian ArmyeSakal
Updated on

इस्रायलने तयार केलेली स्पाईक-NLOS मिसाईल आता भारताला मिळणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमध्ये ही मिसाईल असणार आहे. भरपूर उंचावर असणारे शत्रूचे टँक आणि इतर वाहनांना टार्गेट करण्यासाठी या मिसाईलचा वापर होईल. या क्षेपणास्त्राला चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्याकडे पूर्वीपासूनच एक स्पाईक मिसाईल आहे. मात्र, ही मिसाईल सैनिक आपल्या खांद्यावरुन लाँच करत होते. आता या क्षेपणास्त्राचं एअर-फोर्स व्हर्जन भारताकडे आलं आहे. यामुळे हेलिकॉप्टरवरुन हे क्षेपणास्त्र लाँच करता येणार आहे.

Spike ATGM Indian Army
Mahindra Armado : भारतीय सैन्याला मिळाली अनस्टॉपेबल कार, पाहा फीचर्स

काय आहे खास?

स्पाईक अँटी-टँक गाईडेड मिसाईल ही आकाराने अगदी छोटी आहे. मात्र, याच्या मदतीने एक संपूर्ण टँक उद्धवस्त केला जाऊ शकतो. ही मिसाईल खांद्यावर ठेऊन किंवा ट्रायपॉड-बायपॉड अशा स्टँडवर ठेऊनही डागली जाऊ शकते. हेलिकॉप्टर, टँक अशा वाहनांमध्येही ही मिसाईल घेऊन जाऊ शकतो.

गाईडेड मिसाईल

ही एक गाईडेड मिसाईल आहे. म्हणजे एकदा टार्गेट फिक्स झालं की त्याने कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरीही ही त्याचा वेध घेते. यामुळे शत्रूची वाहनं ना पळू शकतात, ना लपू शकतात. केवळ टँकच नाही, तर शत्रूच्या हेलिकॉप्टरचा वेध घेण्याची क्षमताही यामध्ये आहे. इस्राईलसोबतच जगातील ३५ देशांकडे ही मिसाईल आहे.

Spike ATGM Indian Army
'मेक इन इंडिया' धोरणामुळे भारतीय सैन्याला शस्त्रांचा तुटवडा; ब्लूमबर्गचा रिपोर्ट

अंधारातही घेतं शत्रूचा वेध

'Spike ATGM'चे एकूण ९ व्हेरियंट आहेत. यानुसार त्यांच्या आकारात, लाँचिंग पद्धतीत आणि रेंजमध्ये बदल होतो. भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये ६०० ते २५ हजार मीटर रेंज असणारी स्पाईक मिसाईल बसवण्यात येणार आहे. या मिसाईलमध्ये इन्फ्रारेड सेन्सरही असतो. त्यामुळे अंधारातही शत्रूच्या वाहनांचा वेध घेण्याची क्षमता यात आहे.

२०१९ या वर्षाच्या सुरुवातीला चीन आणि पाकिस्तानसोबत सीमेवर संघर्ष वाढला होता. यामुळे मोदी सरकारने आपत्कालीन स्थितीत इस्राईकडून २४० स्पाईक MR मिसाईल आणि १२ लाँचर्स मागवले होते. त्याच वर्षाच्या अखेरीस त्यांना सैन्याकडे सुपूर्द करण्यात आलं. आता वायुसेनेलाही आणखी स्पाईक मिसाईल मिळाल्या आहेत.

Spike ATGM Indian Army
'आत्मनिर्भर भारत'ला बूस्ट; वायुसेना देशातच बनवणार 96 लढाऊ विमाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.