NASA-ISRO ISS Mission: नासा आणि इस्रोचे अंतराळ मिशन; पण चर्चा फक्त ग्रुप कॅप्टनचीच, कोण आहेत गगनयात्री शुभांशु शुक्ला?

NASA-ISRO Gaganyan Mission : इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच भारताचे दोन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. ही नासा आणि इस्रोची एकत्रित मोहीम असणार आहे.
India’s Group Captain Shukla to Lead ISS Mission under NASA-Axiom Agreement
India’s Group Captain Shukla to Lead ISS Mission under NASA-Axiom Agreementesakal
Updated on

ISRO- NASA Axiom Agreement : भारताच्या अंतराळ स्थानकावर जाण्याच्या प्रतीक्षा अखेर संपल्या आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची Axiom Space या कंपनीने करार केल्यामुळे भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांग्शु शुक्ला हे लवकरच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station - ISS) जाणार आहेत.

इस्रोच्या म्हणण्यानुसार, Axiom-4 या मोहिमेसाठी अमेरिकेसोबत करार झाला असून यात भारताचे दोन अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यापैकी ग्रुप कॅप्टन शुक्ला हे मुख्य अंतराळवीर (Pilot) असतील तर ग्रुप कॅप्टन प्रसन्न बालकृष्णन नायर हे त्यांचे सह-अंतराळवीर (Backup Pilot) असतील

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच या दोन्ही अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु होणार आहे. या प्रशिक्षणाला "गगनयात्री" असं म्हटलं जातंय. अंतराळात असताना हे दोन्ही अधिकारी निवडक वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान प्रदर्शन प्रयोग करणार आहेत. तसेच अंतराळाशी संबंधित जनजागृती कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत.

India’s Group Captain Shukla to Lead ISS Mission under NASA-Axiom Agreement
NASA Mission: सुनीता विलियम्स अजून परतल्या नाही, तोवर नासा अंतराळात पाठवतंय 4 अंतराळवीर,काय आहे मोहीम?

या मोहिमेसोबत अमेरिकेच्या पेगी व्हिटसन (Command Pilot), पोलंडचे स्लावोश उझान्स्की (Mission Specialist) आणि हंगेरीचे टिबोर कपु (Mission Specialist) हे देखील सहभागी होणार आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी भारतीय हवाई दलातील चार चाचणी वैमानिकांची निवड करण्यात आली होती. त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण इस्रोच्या बंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात सुरु झाली आहे. ही "गगनयान" मोहिमेसाठीची तयारी आहे.

गगनयान ही एक महत्वाकांक्षी भारतीय अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेद्वारे तीन सदस्यांचं अंतराळयान तंत्रज्ञान भारताकडे असल्याचं दाखवून देण्याचा उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत तीन सदस्यांचं 400 किलोमीटर अंतराळात 3 दिवसांसाठी प्रक्षेपण करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे भारतीय जलसीमेत परत आणण्यात येईल.

India’s Group Captain Shukla to Lead ISS Mission under NASA-Axiom Agreement
Sunita Williams in Space : सुनीता विलियम्सला अंतराळात मिळाली एक दिवसाची सुट्टी; काय-काय केली धमाल? एकदा बघाच

ग्रुप कॅप्टन शुभांग्शु शुक्ला कोण आहेत?

लखनऊ या ऐतिहासिक शहरात जन्मलेले ग्रुप कॅप्टन शुभांग्शु शुक्ला यांचा भारतीय हवाई दलातील प्रवास सुमारे 18 वर्षांपूर्वी सुरु झाला होता. त्यावेळी त्यांनी कठोर आणि दीर्घकालीन लष्करी प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण अकॅडेमीमध्ये प्रवेश घेतला होता.

कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कथा वाचून त्यांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली होती. 1999 साली कारगिलमध्ये युद्ध सुरु झालं तेव्हा ते फक्त 14 वर्षांचे होते. त्यावेळी पाकिस्तानी घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय चौक्यांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता.तेव्हापासून कॅप्टन शुक्ला यांचे देश सेवा करण्याचे स्वप्न आहे,अशी माहिती वृत्तसंस्थांशी बोलताना त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

नासा आणि इस्रोची ही मोहीम नक्कीच अवकाश संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार आहे यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.