माहितीची देवाणघेवाण आणि एकमेकांमधील संवादासाठी WhatsApp हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अशात भारत सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची सुविधा WhatsApp वर सुरु करण्यात आली आहे. खास WhatsApp वरील या सुविधेमुळे आता कोरोना व्हायरस संबंधित माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळू शकणार आहे. भारतीय सरकार मार्फत MyGov Corona हेल्पडेस्क सुरु करण्यात आलाय.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलंय. चीनमधील वूहान प्रांतातुन कोरोना पसरला आणि आज त्याचे परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळतायत. अशात पृथीवरील लाखो नागरिकांना कोरोनाची लागण झालीये. जगभरात दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांनी कोरोना Covid-19 मुळे आपले प्राण गमावलेत. चीन मागोमाग आता इटलीतील भयावह परिस्थिती आपण पाहतोय. दरम्यान भारतात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून WhatsApp आणि भारतीय सरकारने पुढाकार घेतलाय, ज्याअंतर्गत आता MyGov Corona हेल्पडेस्क सुरु करण्यात आलाय. या माध्यमातून आता भारतातील नागरिकांना कोरोना संबंधित माहिती दिली जाणार आहे.
हे लक्षात राहू द्या : कोरोनालाही AC प्रचंड आवडतो, त्यामुळे तुम्ही तुमचा AC बंदच ठेवलेला बरा...
Coronavirus (Covid-19) च्या बाबतीत नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे. म्हनुनच केंद्र सरकारकडून आता मोठं पाऊल उचलण्यात आलंय. केंद्र सरकारकडून कोरोनाची माहिती देण्यासाठी अधिकृत चॅटबॉक्स सुरु करण्यात आलाय. #WhatsApp च्या माध्यमातून आता आपल्याला कोरोना संदर्भात माहिती मिळू शकणार आहे. WhatsApp वरून खरंतर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. अशात सरकारकडून 'MyGov Corona Helpdesk' हा अधिकृत चॅटबॉक्स अफवा रोखण्याचं आणि अधिकृत तसंच योग्य माहिती देण्याचं काम करणार आहे.
अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन् कच्छ एक्स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...
असा वापरा MyGov Corona Helpdesk :
कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी (WHO) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील असा प्रयोग करण्यात आलाय. याचसोबत मायक्रोसॉफ्टचं सर्च इंजिन असणाऱ्या BING ने देखील कोरोना लाईव्ह ट्रॅकर सुविधा लॉन्च केलीये. अशा सुविधांच्या माध्यमातून कोरनाबाबत मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात येतंय.
indian government starts official chatbox for providing official info about covid19 on Whastapp
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.