रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आधी प्रवास करा, नंतर भाडे भरा; असा घ्या लाभ

Book Now, Pay Later: तुमच्याकडे पैसे नसले तरीही तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता आणि नंतर त्याचे पैसे देऊ शकता.
Railway Ticket, book now, pay later
Railway Ticket, book now, pay laterSakal
Updated on

Indian Railway Ticket Booking: रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता आणि प्रवासानंतर पैसे देऊ शकता. होय, हे खरे आहे कारण पेटीएम तुम्हाला ही सुविधा देत आहे.पेटीएमने पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm PG) युजर्ससाठी आता पेटीएम प्लॅटफॉर्मवर पेटीएम पोस्टपेड लाँच केली आहे. त्यामाध्यमातून IRCTC तिकीट सेवेवर आता बुक करा, नंतर पैसे द्या' (book now, pay later) याचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच पेटीएम पोस्टपेड वापरकर्ते नंतर रक्कम भरण्याचा पर्याय निवडून त्यांची तिकिटे IRCTC द्वारे बुक करू शकतील. ही सुविधा शेकडो लोकांसाठी वरदान ठरू शकते कारण वापरकर्ते तत्काळ पैसे न भरताही रेल्वे तिकीट बुक करू शकतील.

Railway Ticket, book now, pay later
रेल्वे प्रवाशांची परवड; आरक्षित तिकीट असेल तर जाता येईल

कंपनीने म्हटले आहे की वापरकर्त्यांनी 'बुक नाऊ, पे लेटर' या सुविधेचा अवलंब करायला सुरुवात केली आहे, कारण त्यामुळे युजर्सच्या तिकीट बुक करणे, बिले भरणे किंवा खरेदी करणे अशा आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातात. युजर्स किरकोळ दुकाने आणि वेबसाइट्सवर उत्पादन आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

30 दिवसांसाठी 60000 रुपयांपर्यंत व्याजमुक्त क्रेडिट-

Paytm पोस्टपेड 30 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी 60000 रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त क्रेडिट ऑफर करते आणि वापरकर्त्यांना त्यांच्या सर्व क्रेडिट-आधारित खर्चाचा मागोवा ठेवण्यासाठी मासिक बिल दिले जाते. वापरकर्ते बिलिंग सायकलच्या शेवटी संपूर्ण रक्कम भरू शकतात किंवा त्यांचे बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतात.

Railway Ticket, book now, pay later
IPL साठी काढलं 3500 रुपयांचे तिकीट; बसवलं टपऱ्यांवरच्या खुर्चीत

पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​सीईओ प्रवीण शर्मा म्हणाले, “आम्ही आमच्या युजर्सना डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपाय ऑफर करण्याचा प्रयत्न करत असतो. पेटीएम पोस्टपेड (BNPL) आता IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुक करू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल."

IRCTC तिकीट बुकिंगसाठी पेटीएम पोस्टपेड (बीएनपीएल) कसे वापरावे:

1) IRCTC वर जा, तुमच्या प्रवासाचा तपशील भरा आणि पेमेंट विभागात 'Pay Later' निवडा

२) पेटीएम पोस्टपेड वर क्लिक करा

3) पेटीएम क्रेडेंशियल्स वापरून लॉग इन करा, ओटीपी प्रविष्ट करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.