Agnibaan Rocket Launch : जगातील पहिली 3D-प्रिंट रॉकेट इंजिन चाचणी यशस्वी ; भारतावर कौतुकाचा वर्षाव

Agnikul Cosmos Agnibaan Rocket : चार वेळा उड्डाण झालेले रद्द, श्रीहरीकोटा स्पेसपोर्टवरून लाँच
Agnikul Cosmos' Agnibaan Rocket Successfully Launched
Agnikul Cosmos' Agnibaan Rocket Successfully Launched esakal
Updated on

Agnikul Cosmos : भारतीय अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉसने गुरुवारी याआधी किमान चार वेळा प्रक्षेपण रद्द केल्यानंतर, जगातील पहिले सिंगल-पीस 3D-प्रिंटेड रॉकेट इंजिनद्वारे समर्थित आपले पहिले सब-ऑर्बिटल चाचणी वाहन यशस्वीरित्या लाँच केले. ही एक महत्वपूर्ण परीक्षा उड्डाण असून, अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतासाठी मोठे यश आहे.

अग्निबान SOrTeD (सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) ने गुरुवारी सकाळी 7.15 वाजता आकाशात झेप घेतली. भारतातील खाजगी स्टार्टअपचे हे दुसरे प्रक्षेपण असले तरी, कंपनीने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात देशातील एकमेव कार्यरत स्पेसपोर्टवर स्थापित केलेले खाजगी लॉन्चपॅड वापरणारे हे पहिले आहे.

Agnikul Cosmos' Agnibaan Rocket Successfully Launched
Egypt Cancer Treatment : इजिप्तमध्ये ४००० वर्षांपूर्वी व्हायचा कॅन्सरवर उपचार ; संशोधनातून आश्चर्यदायक माहिती आली समोर

ISRO ने या यशस्वी उड्डाणाचे वर्णन "महत्वपूर्ण टप्पा" असे केले आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटले आहे, "Agnikul Cosmos ला त्यांच्या स्वतंत्र लाँचपॅडवरून Agnibaan SoRTed-01 चे यशस्वी उड्डाण केल्याबद्दल अभिनंदन! हे 3D प्रिंटिंगद्वारे बनवलेल्या पहिले सेमी-क्रायोजेनिक इंजिनसह नियंत्रित उड्डाण भारतासाठी मोठे यश आहे." (Sub-Orbital Technology Demonstrator)

ही उड्डाण मोहिम सुमारे दोन मिनिटांची होती. या मोहिमेसाठी वापरण्यात आलेल्या प्रक्षेपनाची उंची 6.2 मीटर असून, त्याच्या टोकावर अंडाकृती आकाराचा कोन आहे. या प्रक्षेपनात स्वदेशात विकसित अत्याधुनिक एव्हियोनिक्स आणि ऑटोपायल्ट सॉफ्टवेअर समाविष्ट आहे.

अग्निबाण हे जगातील पहिले 3D प्रिंटिंग केलेले सेमी-क्रायोजेनिक इंजिन असून, ते या प्रक्षेपनाची ताकद आहे. या उड्डाणादरम्यान अनेक टप्प्यांत बारकाईने आखलेले हवाई मार्ग वापरण्यात आले, शेवटी हे प्रक्षेपण बंगालच्या उपसागरात यशस्वीरित्या उतरले.

Agnikul Cosmos' Agnibaan Rocket Successfully Launched
World's Youngest Artist : सोशल मीडियावर फेमस झालेला चिमुकला चित्रकार पाहिलात काय? वयाच्या पहिल्या वर्षीच 'गिनीज बुक'मध्ये नोंद

हे यशस्वी उड्डाण Agnikul Cosmosसाठी मोठा टप्पा आहे. ही कंपनी अब्ज डॉलरच्या लघु उपग्रह प्रक्षेपण मार्केटवर लक्ष्य केंद्रित करत आहे. या उड्डाणाच्या आधारे मिळालेल्या माहितीचा वापर करून आगामी काळात अग्निबाण प्रक्षेपणाच्या विकासात सुधारणा केली जाणार आहे.

हे प्रक्षेपण अत्यंत वेगळे असून, ते 700 किमी अंतराळात 300 किलो वजन असणारे उपग्रह घेऊन जाण्याची क्षमता असलेले आहे. (Sub-Orbital Technology Demonstrator)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.