GitHub report : भारतात सध्या 13 लाखांहून अधिक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, 2027 पर्यंत अमेरिकेलाही मागे टाकणार - रिपोर्ट

गिटहब कंपनीमध्ये 2023 या वर्षातच 3.5 दशलक्ष नवे डेव्हलपर्स जोडले गेले असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
Github report Indian Developers
Github report Indian DeveloperseSakal
Updated on

भारत सध्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. देशामध्ये सध्या 13 लाखांहून अधिक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत. 2027 सालापर्यंत देशातील डेव्हलपर्सची संख्या अमेरिकेपेक्षाही जास्त होणार असल्याचा दावा गिटहबच्या अहवालात करण्यात आला आहे. गिटहब कंपनीमध्ये 2023 या वर्षातच 3.5 दशलक्ष नवे डेव्हलपर्स जोडले गेले असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

गिटहबवर एकूण डेव्हलपर्सची संख्या आता 13.2 दशलक्ष झाली आहे. गिटहब हे जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे. ही संख्या आणि देशातील डेव्हलपर्सची होणारी वाढ पाहता, 2027 पर्यंत भारतातील डेव्हलपर्सची संख्या ही अमेरिकेतील डेव्हलपर्सपेक्षा अधिक असणार आहे, असं स्टेलर ग्रोथ या कंपनीने म्हटलं आहे.

Github report Indian Developers
AI CEO Mika : जगातील पहिली एआय-सीईओ समोर; मस्क-झुकरबर्ग यांच्याहूनही सरस काम, सुट्टीही नाही घेत!

एआयमध्ये भारताचं योगदान

"भारतामधील डेव्हलपर्स कम्युनिटी ही एक इनोव्हेशन पॉवरहाऊस आहे. गिटहबवरील एआय प्रोजेक्टमध्ये भारतीय डेव्हलपर्स अगदी महत्त्वाचं योगदान करत आहेत. भारतातील डेव्हलपर्स जगभरातील एआयमध्ये बदल घडवून एआयचं भवितव्य बदलत आहेत." असं एपीएसी कंपनीच्या उपाध्यक्ष शॅरीन नापिअर म्हणाल्या.

जगातील एआय प्रोजेक्ट्स हे दरवर्षी 148 टक्क्यांची वाढ दाखवत आहेत. भारताव्यतिरिक्त अमेरिका, जर्मनी, जपान, हाँगकाँग, यूके आणि फ्रान्स या देशांमध्ये देखील डेव्हलपर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.