Nuclear Missile Submarine : भारताचे संशोधन क्षेत्रात महत्वाचे पाऊल; चौथी न्यूक्लियर मिसाइल सबमरीन लाँच,सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये

India's Fourth nuclear missile submarine : भारताने चौथी न्यूक्लियर-शस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे.
India's nuclear missile submarine
SSBN S4 submarine launchesakal
Updated on

India's Nuclear Missile Submarine Launch : भारताने नुकतीच चौथी न्यूक्लियर-शस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे. विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये या नवीन सबमरीनचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे भारताच्या आण्विक प्रतिरोध क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सबमरीनमध्ये के-4 बॅलेस्टिक मिसाइल्स बसवण्यात आले आहेत, ज्यांचा रेंज 3,500 किमी आहे. याआधीच्या SSBNमध्ये के-15 मिसाइल्स होते, परंतु नवीन सबमरीनमध्ये केवळ के-4 मिसाइल्स वापरले जात आहेत.

16 ऑक्टोबर रोजी लाँच झालेली ही नवीन सबमरीन, एस4 (S4*) म्हणून ओळखली जाते. ही लाँचिंग अगदी मोजक्या लोकांसमोर करण्यात आली होती. या अगोदर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी दुसरी SSBN, INS अरिघाट, सेवेत दाखल केली होती. पुढील वर्षी तिसरी SSBN, INS अरिधमान, सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

India's nuclear missile submarine
Google Pixel 8 Discount : गुगल पिक्सेल 8 फोनवर मिळतोय चक्क 38 हजारचा डिस्काउंट; काय आहे खास ऑफर? कुठे खरेदी कराल बघा

भारतातील आण्विक क्षेपणास्त्रांवरील हा प्रकल्प देशाच्या इतर महत्वाकांक्षी योजनांशी संबंधित आहे. सरकारने दोन आण्विक-सशस्त्र आक्रमण सबमरीन बांधण्यास देखील मान्यता दिली आहे, ज्यामुळे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात भारताची उपस्थिती अधिक बळकट होईल.

India's nuclear missile submarine
Indian Railways Blanket Hygiene : रेल्वेतील चादर,ब्लँकेट किती दिवसांतून धुतले जातात? RTI मधून समोर आली धक्कादायक माहिती

याशिवाय, रशियाकडून 2028 पर्यंत आणखी एक अकुला-क्लास न्यूक्लियर सबमरीन लीजवर घेण्याची योजना आहे. भारताच्या या आघाडीच्या योजना, चीनसारख्या प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत, कारण चिनी दीर्घ-रेंज क्षेपणास्त्रांपासून विमानवाहू नौकांना धोका आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तिसऱ्या विमानवाहू नौकेच्या जागी आण्विक सबमरीनला प्राधान्य दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.