Whatsapp Flight Ticket : आता व्हाट्सअप बुक करेल तुमचं फ्लाईट तिकीट;इंडिगोने आणलंय हे नवीन AI फिचर,जाणून घ्या एका क्लीकवर
Ticket Booking : आजकाल सगळे काही आपण व्हाट्सअप वरच करतो ना? चॅट,व्हिडीओ कॉल आणि डिजिटल पेमेंटसुद्धा आपण करू शकतो. मग विमान तिकीट बुक करणं का मागे राहील? भारताची आवडती विमान कंपनी इंडिगोने आपल्यासाठी एक धमाकेदार घोषणा केली आहे. आता तुम्ही व्हाट्सअप चॅट करतानाच तुमच्या ट्रॅव्हल प्लान्सची सोय करू शकता. वा! छान नाही?
इंडिगोची ही 6Eskai सुविधा अगदी वेगळी आहे. रिआफी या गुगलच्या पार्टनर कंपनीच्या AI प्लॅटफॉर्मवर ती बनली आहे. ही तुमची एक डिजिटल ट्रॅव्हल एजंट आहे जी तुमच्या व्हाट्सअपवर थेट तुमच्याशी संवाद साधेल.
त्याच्या सहाय्याने तुम्ही विमान तिकीट बुक करू शकता, चेक-इन करू शकता, बोर्डिंग पास मिळवू शकता, फ्लाइट स्टेटस चेक करू शकता आणि अगदी तुमच्या ट्रॅव्हलशी संबंधित छोटे छोटे प्रश्नही विचारू शकता. अगदी तुमच्या खिशात असलेल्या तुमच्या खास ट्रॅव्हल एजंटसारखं! आणि ही इंग्रजी, हिंदी आणि तामीळ या तीन भाषांमध्ये तुमच्याशी संवाद साधू शकते.
ही सेवा सुरू करण्यासाठी फक्त +91 7065145858 या व्हाट्सअप नंबरवर मेसेज करावा लागणार आहे.
गुगल क्लॉउडच्या अत्याधुनिक लार्ज लँग्वेज मॉडेल्सवर चालणारी ही '6Eskai' फ्रिक्वेंट फ्लायर्ससाठी प्रवास अधिक सोपा करणार आहे. विशेष म्हणजे, तुमच्या भावना ओळखून थोडं विनोद करत तुमच्याशी संवाद साधेल आणि तुमच्या प्रवासातील अनुभव आनंददायक बनवेल. ही फक्त तुमची कामं करणार नाही तर त्यात थोडा इंटरेस्टही आणेल.
जर तुम्हाला तिकीट बुक करायचं आहे, डिस्काउंट लागू करायचा आहे किंवा ऑनलाइन चेक-इन करायचं आहे तर '6Eskai' तुमची सर्व मदत करेल. अगदी तुमची सीट निवडायची आहे, ट्रिप प्लान करायचा आहे किंवा फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत तरी हे सुद्धा AI असिस्टंट करणार आहे. आणि जर तुम्हाला कधी एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असेल तर '6Eskai' तुम्हाला त्या एजंटशीही जोडूनही शकते.
इंडिगोचे चीफ डिजिटल आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर नीतन चोपरा यांनी या नवीन फीचरबद्दल आनंद व्यक्त केला.
या AI असिस्टंटमुळे आता विमानाचे तिकीट बुक करणे अधिक सोपे होणार आहे. एक तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला अनेक वेबसाईट चाळून घ्याव्या लागणार नाहीत. फक्त काही क्षणातच तुम्हाला परफेक्ट माहिती मिळवून देणारा हा सहाय्यक तुमच्या Whatsappमध्ये नेहमी सोबत असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.