Infinix ने आणखी एक स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा हँडसेट Infinix Note 12 Pro 5G या स्मार्टफोनचा 4G व्हेरिएंट Infinix Note 12 Pro 4G आहे. हा फोन MediaTek Helio G99 प्रोसेसर सह येणारा पहिला डिवाइस आहे. AliExpress वर फोनची किंमत $199.9 (सुमारे 15,970 रुपये) आहे. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. यामध्ये कंपनी 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देखील देत आहे. चला तर मग या स्मार्टफोनची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Infinix Note 12 Pro 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Infinix चा हा फोन 6.7-इंचाच्या फुल एचडी + AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे, जो 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये कंपनी प्रोसेसर म्हणून 6nm MediaTek Helio G99 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
कॅमेरा
यात 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 2-मेगापिक्सेलचा दुय्यम आणि 2-मेगापिक्सेल तीसरा कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
OS बद्दल बोलायचे झाले तर, Infinix चा हा 4G डिवाइस Android 12 वर आधारित कंपनीच्या XOS 10.6 वर काम करतो. आवाजासाठी या फोनमध्ये DTS ऑडिओ सपोर्टही देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमधील सर्व स्टँडर्ड पर्यायांसह NFC देखील उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.