Infinix Zero Ultra launched in india: अखेर प्रतीक्षा संपली असून Infinix ने भारतात 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Infinix Zero Ultra हा देशातील पहिला फोन आहे जो 180W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. Infinix Zero ultra मध्ये कर्व्ह्ड-एज AMOLED डिस्प्ले, 200-मेगापिक्सेल कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आली आहेत. नवीन Infinix फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल सर्वकाही जाणून घेऊया.
Infinix Zero Ultra भारतात किंमत
Infinix Zero Ultra भारतात अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 25 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पासून फोनची विक्री सुरू होईल. हा फोन Coslite Silver आणि Genesis Noir कलर व्हेरिएंटमध्ये येतो.
Infinix Zero Ultra स्पेसिफिकेशन्स
डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix Zero Ultra स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनला स्क्रीनच्या मध्यभागी एक पंच-होल दिलं आहे ज्याला आहे. Infinix च्या या हँडसेटमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आहे जी फुलएचडी+ रिझोल्यूशन देते. स्क्रीनचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे.
RAM, स्टोरेज, सॉफ्टवेअर आणि प्रोसेसर
Infinix Zero Ultra मध्ये 6nm आधारित MediaTek Dimensity 920 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येऊ शकते. Infinix च्या या फोनमध्ये Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आधारित XOS 12 प्री-इंस्टॉल आहे.
Infinix Zero Ultra चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेला 200-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा. हा कॅमेरा OIS ला सपोर्ट करतो. फोनमध्ये 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर देखील आहेत. झिरो अल्ट्राला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ड्युअल-एलईडी फ्लॅशसह 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
बॅटरी
Infinix Zero Ultra मध्ये 4500mAh बॅटरी आहे. बॅटरी 180W थंडर चार्जरसह येते आणि कंपनीचा दावा आहे की ती 12 मिनिटांत बॅटरी पूर्ण चार्ज करेल.
Infinix Zero Ultra मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम, 5जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.