Instagram Chat Features: इन्स्टाग्रामने लाँच केले दोन नवे चॅट फीचर्स; मेसेज करता येणार एडिट अन् पिन.. जाणून घ्या!

Instagram New Features : एखादा मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला त्या मेसेजवर लाँग प्रेस करावे लागेल. यानंतर एक मेन्यू ओपन होईल, ज्यामध्ये Edit Message हा पर्याय उपलब्ध असेल.
Instagram Chat Features
Instagram Chat FeatureseSakal
Updated on

Instagram New Chat Features : सोशल मीडियातील फोटो आणि व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम जगभरात लोकप्रिय आहे. आपल्या यूजर्ससाठी मेटा या प्लॅटफॉर्मवर कित्येक नवीन फीचर्स देत असतं. इन्स्टाग्रामने आता चॅटिंगसाठी दोन नवीन फीचर्स दिले आहेत. यूजर्सना आता व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे इन्स्टाग्रामचे मेसेजही एडिट करता येणार आहेत.

इन्स्टाग्रामने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. या वर्षाचे दोन महिने कमी झाले आहेत, मात्र इन्स्टाग्राममध्ये दोन नवे फीचर्स जोडले गेले आहेत; अशा आशयाची पोस्ट इन्स्टाग्रामने केली आहे. मेसेज एडिट करण्यासोबतच, चॅट्स पिन करण्याची सुविधाही इन्स्टा देणार आहे. (Instagram Message Edit Feature)

कसे आहेत फीचर्स?

यूजर्सना आता चुकीचा मेसेज एडिट करता येणार आहे. यासाठी 15 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. मेसेज पाठवून 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाला असेल, तर तो एडिट करता येणार नाही. यासोबतच यूजर्सना आपले फेव्हरेट किंवा महत्त्वाचे तीन चॅट्स 'पिन' करता येणार आहेत. यामुळे हे तीन चॅट्स कायम सर्वात वरती राहतील, आणि तुमचे महत्त्वाचे मेसेज मिस होणार नाहीत.

हे दोन्ही फीचर्स व्हॉट्सअ‍ॅपवर आधीपासूनच उपलब्ध आहेत. आता इन्स्टावर देखील हे फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर असणारे 'टर्न ऑफ रीड रिसिप्ट्स' (Turn off read receipts), सेव्ह फेव्हरेट स्टिकर्स (Instagram Stickers), रिप्लाय टेक्स्ट विथ GIF, फोटो किंवा व्हिडिओ असे फीचर्सही इन्स्टाग्रामवर देण्यात आले आहेत. यामुळे इन्स्टावर चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे. (Insta Chat features)

Instagram Chat Features
Instagram Flipside : आता ठराविक लोकांसाठी बनवू शकता दुसरी प्रोफाईल; इन्स्टाग्राम यूजर्सना मिळणार खास फीचर

असा करा वापर

एखादा मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला त्या मेसेजवर लाँग प्रेस करावे लागेल. यानंतर एक मेन्यू ओपन होईल, ज्यामध्ये Edit Message हा पर्याय उपलब्ध असेल. एखादं चॅट पिन करण्यासाठी तुम्हाला मेसेजेसमध्ये जावं लागेल, यानंतर जे चॅट तुम्हाला पिन करायचं आहे, त्यावर लेफ्ट स्वाईप करा. यानंतर Pin हा पर्याय निवडा. याच पद्धतीने तुम्ही पिन केलेलं चॅट अनपिन देखील करू शकाल. तुम्ही या पद्धतीने तीन ग्रुप किंवा पर्सनल चॅट्स पिन करू शकता. (How to Pin Instagram Chats)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()