Instagram तुमचे लोकेशन फॉलोवर्ससोबत शेअर करते? सीईओनी दिलं उत्तर

instagram ceo adam mosseri on viral post claims instagram shares users location with followers
instagram ceo adam mosseri on viral post claims instagram shares users location with followers
Updated on

सध्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म Instagram बद्दल एक मोठा दावा केला जात आहे की Instagram हे वापरकर्त्याचे लोकेशन फॉलोअर्ससोबत शेअर करते. हा दावा इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की नुकत्याच झालेल्या iOS अपडेटद्वारे यूजर्स इंस्टाग्रामवरून यूजरचे खरे लोकेशन ट्रॅक करू शकतात.

यामुळे वापरकर्त्यांचे लोकेशन शेअर झाल्याने गुन्हेगार इंस्टाग्रामद्वारे तुमचे अचूक लोकेशन आणि घराचा पत्ता मिळवू शकतात, हे धोकादायक ठरू शकते. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याची माहिती इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी पोस्ट करून दिली आहे, ज्यात मोसेरीच्या वतीने इन्स्टाग्राम लोकेशन शेअर केल्याच्या या दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे.

मोसेरी यांनी ट्विटरवर लिहिले की, इन्स्टाग्रामच्या नवीन अपडेटमध्ये लोकेशन ट्रॅकचे कोणतेही फीचर देण्यात आलेले नाही, तसेच इन्स्टाग्राममध्ये असे कोणतेही नवीन फीचर देण्यात आलेले नाही. यामध्ये लोकेशन टॅगसारख्या गोष्टी अधिक सुरक्षित बनवण्यात आल्या आहेत. Instagram तुम्हाला तुमचे लोकेशन इतर लोकांसह शेअर करण्याची परवानगी देत ​​नाही. Instagram ने त्याच्या अधिकृत अकाउंटवरून देखील शेअर केले आहे की, फोटो-शेअरिंग अॅप लोकेशन टॅग आणि मॅप्स फीचर यासारखे फीचर्स यासरख्या गोष्टींसाठी अचूक लोकेशन वापरते. लोकांना त्यांच्या डिव्हाइस सेटिंग्ज मध्ये बदल करून लोकेशन ट्रॅक लपवण्याचा ऑप्शन देण्यात येतो. जर त्यांना ती माहिती शेअर करायची असेल तर ते त्यांच्या पोस्टवर लोकेशन टॅग करू शकतात.

instagram ceo adam mosseri on viral post claims instagram shares users location with followers
Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

दरम्यान एका वापरकर्त्याने दावा केला आहे की अलीकडील iOS अपडेट लोकांना Instagram वरून तुमचे अचूक लोकेशन शोधू देईल. तुम्ही इंस्टाग्रामवर लोकेशन टॅग शेअर केल्यास ते तुमचे नेमके लोकेशन सोबतच तुमची लोकेशन दाखवेल, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर वापरकर्त्यांनी तुमच्या iPhone वरील लोकेशन बंद करण्याची सूचना देखील केली आहे.

instagram ceo adam mosseri on viral post claims instagram shares users location with followers
OnePlus चे पहिले वायर्ड इअरफोन येतायत 27 ऑगस्टला, जाणून घ्या फीचर्स-किंमत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.