Instagram Flipside : आता ठराविक लोकांसाठी बनवू शकता दुसरी प्रोफाईल; इन्स्टाग्राम यूजर्सना मिळणार खास फीचर

कित्येक वेळा आपल्याला आपलं सोशल सर्कल आणि ओळखीच्या लोकांचं सर्कल यांची सरमिसळ नको असते. यासाठीच इन्स्टाग्रामने आता फ्लिपसाईड नावाचं एक नवीन फीचर लाँच केलं आहे.
Instagram Flipside Feature
Instagram Flipside FeatureeSakal
Updated on

Instagram Flipside Feature : आपल्यापैकी कित्येक जण इन्स्टाग्रामचा वापर करतात. याठिकाणी आपण कित्येक जणांना फॉलो करतो. यामध्ये मग ओळखीचे लोक, म्युचुअल फ्रेंड्स, इन्फ्लुएन्सर्स आणि व्हिडिओ क्रिएटर्स यांचा समावेश होतो. कित्येक वेळा आपल्याला आपलं सोशल सर्कल आणि ओळखीच्या लोकांचं सर्कल यांची सरमिसळ नको असते. यासाठीच इन्स्टाग्रामने आता फ्लिपसाईड नावाचं एक नवीन फीचर लाँच केलं आहे.

कित्येक लोक जवळच्या व्यक्तींसाठी एक आणि सोशल लाईफसाठी दुसरं अकाउंट ओपन करतात. मात्र आता असं करण्याची गरज उरणार नाही. एकच अकाउंट कायम ठेऊन तुम्ही ठराविक लोकांसाठी वेगळी प्रोफाईल तयार करू शकाल. (What is Flipside Feature)

कसं आहे हे फीचर?

इन्स्टाग्रामच्या या फीचरमुळे तुम्हाला एकाच अकाउंटवर दोन प्रोफाईल बनवता येतील. यातील एक तुमची मुख्य प्रोफाईल असेल, तर फ्लिप करुन तयार केलेली दुसरी प्रोफाईल असेल. या दुसऱ्या प्रोफाईलमध्ये नवीन नाव, वेगळा फोटो, वेगळ्या प्रकारच्या पोस्ट असं सर्व काही वेगळं तयार करू शकतो. या प्रोफाईलला तुम्ही ठराविक लोकांना अ‍ॅड करू शकता. (How does Flipside feature work)

Instagram Flipside Feature
WhatsApp New Update : आता इतर अ‍ॅप्समधूनही करता येणार व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज; लाँच होणार नवीन फीचर

आपली नॉर्मल प्रोफाईल आणि फ्लिपसाईड प्रोफाईल यामध्ये स्विच करण्यासाठी तुम्हाला एक नवीन बटण मिळेल. आपल्या प्रोफाईलमध्ये खालच्या बाजूला असणाऱ्या या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही दोन्ही प्रोफाईलमध्ये स्विच करू शकाल.

टप्प्या-टप्प्याने मिळणार फीचर

हे फीचर रोलआऊट झालं असून, सर्व इन्स्टाग्राम यूजर्सना टप्प्या-टप्प्याने मिळणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ तुमचं इन्स्टाग्राम अ‍ॅप अपडेट करून घ्यावं लागेल. यामुळे तुम्ही आपली सोशल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगवेगळी ठेऊ शकणार आहात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.