Instagram Features : कधीच विसरला जाणार नाही मित्रांचा वाढदिवस; इन्स्टाग्रामचे ‘हे’ नवे फिचर करून देणार आठवण

इन्स्टाग्राम लवकरच या नव्या फिचर्सची चाचणी सुरू करणार आहे.
Instagram Features
Instagram Features esakal
Updated on

Instagram Features : इन्स्टाग्रामचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इन्स्टाग्रामवरील विविध प्रकारचे फिचर्स, रिल्स, स्टोरी यामध्ये नवनवीन बदल होत असतात. आता लवकरच इन्स्टाग्राम 3 नवे फीचर्स आणणार आहे. ज्यामुळे, वापरकर्त्यांचा इन्स्टाग्रामवरील अनुभव आणखी चांगला होईल.

या फिचर्समध्ये सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्स, बर्थडे फिचर आणि इन्स्टा स्टोरीजसाठी मल्टीपल लिस्ट सारख्या फिचर्सचा समावेश असणार आहे. याबद्दल मेटाने म्हटले आहे की, ते लवकरच या नव्या फिचर्सची चाचणी सुरू करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात इन्स्टाग्रामच्या या नव्या फिचर्सबद्दल.

Instagram Features
Insta Update : इन्स्टाग्रामवर रील्स बनवणाऱ्यांसाठी खुशखबर! अ‍ॅपमध्ये मिळणार मोठं अपडेट; यूजर्सना होणार फायदा

सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्सचे फिचर

सेल्फी व्हिडिओची इन्स्टाग्रामवर चांगलीच चलती आहे. या सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्स जोडण्यासाठी इन्स्टाग्राम लवकरच सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्सचे नवे फिचर आणणार आहे. या फिचरच्या माध्यमातून युझर्स बोलून आणि व्हिडिओ बनवून त्यांचे म्हणणे प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकतीलं.

बर्थडे फिचर

अनेकदा आपण एकमेकांचे वाढदिवस विसरतो. कित्येकदा नोटिफिकेशन येऊन ही आपले त्याकडे लक्ष जात नाही. परंतु, आता असे होणार नाही. कारण, Meta चे इन्स्टाग्राम लवकरच आपल्या युझर्ससाठी खास बर्थडे फिचर आणणार आहे.

या फिचरच्या मदतीमुळे युझर्स त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रोफाईलवर ‘बर्थडे इफेक्ट’ अ‍ॅड करू शकतीलं. यामुळे इन्स्टाग्रामवरील इतर युझर्सना कळेल की आज तुमचा वाढदिवस आहे.

विशेष म्हणजे हे फिचर युझर्सला त्यांच्या फॉलोअर्सच्या वाढदिवसाबद्दल अपडेट्स देण्याचे काम करेलं. तसेच, त्यांना लोकांसोबत स्टिकर्स अपडेट करण्याचीही परवानगी देण्यात येईल.

Instagram Features
Oppo Find N3 Flip : ओप्पोचा फोल्डेबल फोन उद्यापासून खरेदीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मल्टिपल स्टोरीज लिस्टचे फिचर

इन्स्टास्टोरीचा वापर वापरकर्त्यांकडून नेहमीच केला जातो. आता यामध्ये मल्टिपल स्टोरीज लिस्टचे फिचर इन्स्टाग्राम आणणार आहे. मल्टिपल स्टोरीज लिस्ट नावाच्या या फिचरमध्ये तुम्हाला ज्यांना तुमची स्टोरी दाखवायची आहे त्यांना तुम्ही स्टोरीमध्ये समाविष्ट करू शकता.

इन्स्टाग्रामने म्हटलेयं की ते लवकरच या फिचरला अपग्रेड करतील. त्यानंतर, युझर्स त्यांची स्टोरी दाखवण्यासाठी विविध प्रकारची लिस्ट बनवू शकतीलं.

Instagram Features
Instagram Reels : रिल्सच्या माध्यमातून ‘या’ पद्धतीने वाढवा व्यवसाय, जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.