Instagram : एकदम सोप्पयं...इंस्टाग्राम चॅटमधून मॅसेज डिलीट करायचं

इंस्टाग्राम म्हणजे आजच्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत
instagram technology
instagram technology esakal
Updated on

Instagram : इंस्टाग्राम म्हणजे आजच्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत. एकेकाळी फेसबुकची हवा होती, मात्र इंस्टाग्रामने सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच मार्केट खाल्लं.आता तरुणांना इन्स्टाग्राम का आवडतं त्याची बरीच कारण आहेत. यात इंस्टाग्राम त्यांच्या युजर्सना प्रायव्हेट मॅसेजिंगची सुविधा देतं. सोबतच मॅसेजिंग सर्व्हिसवर पूर्णपणे युजरचा कंट्रोल असतो.

instagram technology
Instagram : इन्स्टाग्रामवर येणार नवं फिचर; पैसे मिळवण्यास होणार मदत

बऱ्याचदा घडतं असं की, इन्स्टाग्राम वरून आपण चुकून एखाद्याला मेसेज करतो किंवा अनेक वेळा स्पेलिंग मिस्टेक होते, अशावेळी आपण मॅसेज डिलीट करायचा प्रयत्न करतो. आणि इंस्टाग्रामवर तसा मॅसेज डिलीट करण्याची देखील सोय आहे.

instagram technology
Virat Kohli Instagram: विराट कोहलीने एका रात्रीत गमावले लाखो फॉलोअर्स

इंस्टाग्राम युजर्स त्यांना पाहिजे तेव्हा त्यांचे चॅट डिलीट करू शकतात. सोबतच, ते त्यांच्या चॅटमधून कोणताही स्पेसिफिक मॅसेज डिलीट करू शकतात. पण मग हे करायचं कसं?

1. तर पहिल्यांदा इंस्टाग्राम ऍप उघडा आणि वरच्या उजव्या कोपर्‍यातील मॅसेज ऑप्शनवर टॅप करा. तरीही कळतं नसेल तर लहानपणी आपण जसं कागदाचं विमान करायचो तशा आकाराचं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.

instagram technology
Instagram Down : कोणाचे फॉलोवर्स घडले, तर कोणाचे अकाऊंट सस्पेंड झाले

2. आता मॅसेजमध्ये गेल्यावर वरच्या उजव्या बाजूला बुलेट सारख्या आयकॉनवर टॅप करा.

3. आता तुम्हाला जे जे चॅट डिलीट करायचे आहेत त्या त्या सर्व आयकॉन्सवर क्लिक करा.

4. यानंतर तळाशी-उजव्या कोपर्‍यात दिसणाऱ्या Delete ऑप्शन वर टॅप करा.

5. यानंतर तुम्हाला जे चॅट डिलीट करायचे आहेत त्याची पुष्टी करा.

instagram technology
Instagram : इन्स्टाग्राममध्ये लवकरच येणार नवे फीचर

तुमचे पर्सनल मॅसेज कसे डिलीट कराल?

1. तर यासाठी पहिल्यांदा इन्स्टाग्राम उघडा.

2. आता तुम्हाला जो मॅसेज डिलीट करायचा आहे तो शोधा.

3. त्यानंतर या मॅसेज वर दाबून ठेवलं की तुम्हाला पॉप अप ऑप्शन दिसेल.

4. त्यात अनसेंड असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

instagram technology
Birth Date टाकण्याची Instagram ची सक्ती, काय आहे कारण?

आणि अशाप्रकारे तुमचा मॅसेज डिलीट होईल आणि ज्याला तुम्ही पाठवलाय त्याला ते समजणार ही नाही. म्हणजे आपण व्हाट्सएपवर जेव्हा मॅसेज डिलीट करतो तेव्हा डिलिटेड असा मार्क शिल्लक राहतो. पण इंस्टाग्रामवर तसं काहीच होत नाही, त्यामुळेच कदाचित इंस्टाग्रामची जास्त क्रेझ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.