कोडिशिया’ अशी लोकप्रिय ओळख असलेल्या कोईम्बतूर डिस्ट्रिक्ट स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना ४० सदस्यांनिशी १९६९ साली झाली. आज ही ६७०० हून अधिक सदस्यसंख्या असलेली आयएसओ ९००१ : २०१५ संघटना आहे. या संस्थेचे सदस्य पंप आणि मोटर्स, फौंड्रीज्, वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री आणि त्यांचे भाग, ग्राईंडर्स, वाहनांचे सुटे भाग, स्पेशालिटी व्हॉल्व्हज् अशा विविध विभागात कार्यरत आहेत.
कोईम्बतूर हे प्रॉडक्टस् तसेच एन्सिलरीजच्या निर्मितीचे केंद्र आहे याची कल्पना असायला हवी. पम्प्स आणि मोटर्स, वस्त्रोद्योग, फौंड्रीज्, फॅब्रिकेशन युनिटस्, मशीन शॉप्स, वाहनांंचे सुटे भाग, प्रीसिजन टूल्स, डाईज्, साचे, कटिंग टूल्स यासारखे विविध उद्योग कोईम्बतूरमध्ये आहेत.
एक लाखाहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) कार्यरत असलेले हे क्षेत्र उत्पादक तसेच इतर सोल्यूशन प्रोवाईडर्ससाठी प्रचंड मोठी संधी उपलब्ध करुन देत आहे. या भागातील संपूर्ण अर्थव्यवस्थेला येथील उद्योगांनी हातभार लावला आहे.
या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या इंटरनॅशनल मशीन टूल्स अँड इंडस्ट्रियल ट्रेड फेअर ‘इंटेक’मुळे आवश्यक तंत्रज्ञान त्यांच्या दारात आणून ठेवते.
जीवनरेखा -इंटेक
कोईम्बतूरमधील उद्योगांना आंतरराष्ट्रीय क्षेेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करुन देणारे तसेच या तंत्रज्ञानांचा आपल्या कारखान्यांमध्ये अवलंब करण्याची संधी देणारे ‘इंटेक’ हे ‘वन स्टॉप शॉप’ ठरले आहे. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील ताज्या घडामोडींच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताचा, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा अत्याधिक लाभ करुन देण्याच्या बाबतीत ‘कोडिशिया’ने आघाडीची भूमिका बजावली आहे. ‘इंटेक’ व्यापार मेळ्यांच्या मालिकेची संकल्पना याच उद्देशातून जन्माला आली असून देशातील या भागातील व्यवसायाला चालना देण्यात सिद्ध झालेले साधन ठरले आहे.
‘कोडिशिया’सारख्या संभाव्य खरेदीदारांच्या समुहाकडून आयोजित करण्यात येत असलेला ‘इंटेक’ हा भारतातील एकमेव अभियांत्रिकी मेळा आहे जिथे विक्रेत्यांची थेट निर्णय घेणाऱ्या ग्राहकांशी गाठ पडते. अन्य औद्योगिक व्यापार मेळ्यांच्या तुलनेत ‘इंटेक’मध्ये व्यावसायिक करार झटपट होतात. या भागातील उद्योगांची सदैव नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची तयारी असते.
त्यामुळे ‘इंटेक’मध्ये सहभागी होण्यासाठी सोल्यूशन्स प्रोवाईडर्सना प्रोत्साहन मिळून त्यांना उद्योगांच्या नेमक्या गरजांनुसार पर्याय देणे शक्य होते. उद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे पाठबळ, त्यांचा सहभाग आणि व्यापाराला मिळणारी चालना यामुळे ‘इंटेक’ला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. दक्षिण भारतातील प्रतिष्ठेचा आणि प्रमुख औद्योगिक व्यापार मेळा असा लौकिक ‘इंटेक’ने संपादन केला असून प्रत्येक आयोजनाने या मेळ्याच्या लोकप्रियतेत सतत भर पडत गेली आहे.
‘इंटेक’ व्यापार मेळ्याच्या मालिकेने या क्षेत्राचा भरपूर लाभ झाला आहे. त्यातील काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.
१. ‘इंटेक’मुळे कोईम्बतूरच्या उत्पादनक्षेत्राची क्षमतेची विदेशी उत्पादकांना जाणीव झाली आहे.
२. कोईम्बतूरमध्ये नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानाचा या भागात मार्ग प्रशस्त करुन देणाऱ्या अनेक संयुक्त उपक्रमांना त्यामुळे चालना मिळाली आहे.
३. अनेक विदेशी कंपन्यांनी कोईम्बतूरमध्ये थेट उत्पादन सुविधा स्थापन केल्या आहेत.
४. ‘इंटेक’मुळे जगभरातील प्र्मुख औद्योगिक घराण्यांना बाह्य पुरवठादारांकडून सुटे भाग खरेदी करण्याचे कोईम्बतूर हे अव्वल स्थान ठरले आहे.
५. ‘इंटेक’मुळे नवे तंत्रज्ञान येत असल्यामुळे तयार उत्पादनाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होऊन निर्यातीत वाढ झाल्याने बहुमूल्य परकीय चलनाची कमाई होत आहे.
६. ‘इंटेक’मुळे नाविन्यपूर्ण उत्पादन तंत्रज्ञानांचा अवलंब करणे शक्य झाल्यामुळे जगभरातील स्पेशालिटी व्हॉल्व्ह्जच्या उत्पादकांनी कोईम्बतूरमध्ये निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत.
‘इंटेक’च्या यशात हातभार लावणारे घटक
कोणत्याही उत्कृष्ट उपक्रमाचे यश प्रामुख्याने त्याच्या प्रवर्तकाच्या ताकदीवर अवलंबून असते. ‘कोडिशिया’मुळे जगाच्या नकाशावर आपले स्थान ‘इंटेक’ला बळकट करणे शक्य झाले.
कोईम्बतूरमधील वाढत्या औद्योगिक क्षेत्राचा कणा ठरलेल्या ‘कोडिशिया’ने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक स्थानिक उद्योगांना प्रस्थापित होण्यात ऊर्जा देण्याचे काम केले आहे.
कोईम्बतूरमधील उद्योग विविध अभियांत्रिकी उत्पादने, पूरक आणि सुट्या भागांच्या निर्मितीतून देशाच्या गरजा पूर्ण करीत आहेत. फौंड्री कास्टिंग, मशीन टूल्स, कटिंग टूल्स, इलेक्ट्रिक मोटर्स आणि पंप, वेट ग्राईंडर्स, वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री, औद्योगिक प्लास्टिक आणि भाग, घरगुती वीज उपकरणे, ट्रान्सफॉर्मर्स, इल्युमिनेशन्स, कॉटन युनिटस्, वाहनांचे सुटे भाग, व्हॉल्व्ह्ज, प्रोसेस उपकरणे आदी या भागातील प्रमुख औद्योगिक गतिविधी आहेत.
या उद्योगांमुळे ‘इंटेक’च्या व्यापार मेळ्यातील प्रदर्शकांकडून यंत्रसामुग्रीच्या संभाव्य खरेदीदारांची मोठी संख्या तयार होते.या भागातील लोकांच्या उद्यमशीलतचे चैतन्य तसेच नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची या भागातील लघु आणि मध्यम उद्योगांची मानसिकता सर्व सोल्यूशन प्रोवाईडर्ससाठी व्यवसायाची निश्चिती करते.
इंटेक २०२४
या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल मशीन टूल अँड इंडस्ट्रियल ट्रेड फेअर - ‘इंटेक-२०२४’च्या २० व्या आवृत्तीचे कोडिशिया इंटेक टेक्नॉलॉजी सेंटरच्या वतीने येत्या ६ ते १० जूनदरम्यान कोडिशिया ट्रेड फेअर कॉम्प्लेक्स, कोईम्बतूर येथे भव्य आयोजन करण्यात येत आहे.
‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर व्हिजन २०३०’ (जीएमसीव्ही २०३०) ची अकरावी आवृत्ती आमचे कॉन्फरन्स पार्टनर टेक्सास व्हेंचर्स यांच्या वतीने ७ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आमच्या मेळ्याच्या स्थळी आयोजित करण्यात येत आहे. इंटेक-२०२४ दरम्यान उत्पादन क्षेत्रातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जागतिक नेतृत्व या स्थळी एकत्र येणार आहे. त्यामुळे उत्पादकांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने स्मार्ट उत्पादकतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भूमिका घेणे शक्य होणार आहे.
या व्यापार मेळ्याला भारतभरातील तसेच इतर देशांतील अभियांत्रिकी कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध प्रकारचे सुमारे पाचशे उद्योग या व्यापार मेळ्यात व्यावसायिक संधींचा कानोसा घेण्यासाठी एकत्र येत आहेत.२५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात दर्जेदार तंत्रज्ञानाचे हे उद्योजक प्रदर्शन घडविणार आहेत.
आजच्या जमान्यातील छाप पाडणारे शक्तीशाली तंत्रज्ञान जबरदस्त विकासाच्या क्षमतेचे प्रदर्शन घडवेल याची आम्हाला खात्री आहे.
इंटेक व्यापार मेळ्याला भेट देण्यासाठी अभ्यागतांनी https://visitor.codissia.com/ या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.