Internet Speed Ranking : इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताची मोठी झेप! अवघ्या एका वर्षात तब्बल 51 स्थानांनी वर आला देश...

Speed test Global Index : देशातील इंटरनेट डाऊनलोड स्पीड हा 99.03Mbps एवढा आहे. ही आकडेवारी जानेवारी 2024ची आहे.
Internet Download Speed Ranking
Internet Download Speed RankingeSakal
Updated on

Internet Download Speed Ranking : भारतात सध्या वेगाने 5G इंटरनेटचा विस्तार होतो आहे. मोदी सरकारने 5G लाँचनंतरच 6G टेक्नॉलॉजीसाठी तयारी देखील सुरू केली आहे. अशातच इंटरनेट डाऊनलोडिंग स्पीडच्या बाबतीत एक गुडन्यूज मिळाली आहे. गेल्या एका वर्षाच्या काळात भारताने सर्वाधिक डाऊनलोड स्पीड असणाऱ्या देशांच्या यादीत तब्बल 51 स्थानांची झेप घेतली आहे.

Ookla या कंपनीने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. भारत सध्या सर्वात वेगवान इंटरनेट असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये 18व्या स्थानी आला आहे. देशातील इंटरनेट डाऊनलोड स्पीड हा 99.03Mbps एवढा आहे. ही आकडेवारी जानेवारी 2024ची आहे. जागरणने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

51 स्थानांची झेप

ऊक्लाने दिलेल्या रिपोर्टनुसार, 2023 च्या जानेवारी महिन्यात भारत या यादीमध्ये 69 व्या स्थानावर होता. यावेळी देशातील डाऊनलोडिंग स्पीड 29.95Mbps एवढी होती. त्यानंतर जुलै 2023 मध्ये भारत 53व्या क्रमांकावर पोहोचला. डिसेंबरपर्यंत भारतात 5G चं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलं होतं. त्यामुळे 2023 च्या डिसेंबर महिन्यात या यादीमध्ये भारत 21व्या स्थानी पोहोचला होता. त्यानंतर एकाच महिन्यात भारताने आणखी तीन स्थानांची उडी घेतली. (India Internet Download Speed)

Internet Download Speed Ranking
Odysseus lands on moon : चंद्रावर उतरलं अमेरिकेचं पहिलं खासगी मून लँडर; भारताच्या 'विक्रम'ला मिळाला शेजारी!

टॉप 5 देश

या यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब आमिराती (UAE) या देशामध्ये जगातील सर्वात वेगवान इंटरनेट आहे. याठिकाणी डाऊनलोडिंग स्पीड हा तब्बल 302.38Mbps एवढा आहे. यानंतर कतार (285Mbps), कुवैत (196Mbps), चीन (164Mbps) आणि डेन्मार्क (153Mbps) या देशांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.