२७ वर्षांपासून सेवा देणारं मायक्रोसॉफ्टचं प्रसिद्ध ब्राऊजर इंटरनेट एक्सप्लोरर लवकरच बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टकडून ही घोषणा करण्यात आली आहे. या ब्राऊजरसाठी मायक्रोसॉफ्ट मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार आहे. (Microsoft will shut down internet explorer)
हा ब्राऊजर १९९५ साली विंडोज ९५ (Windows 95) साठी अॅड ऑन पॅकेज (Add-On Package) म्हणून सुरू करण्यात आला होता. हा ब्राऊजर मायक्रोसॉफ्ट पॅकेजसोबत फ्री मिळत होता. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार इंटरनेट एक्सप्लोरर १५ जूनपासून बंद होणार आहे. विंडोज १० (Windows 10) वर इंटरनेट एक्सप्लोरर देत असलेल्या सुविधा आता मायक्रोसॉफ्ट एज देणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge) इंटरनेट एक्सप्लोररच्या तुलनेत अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक ब्राऊजर आहे.
यामध्ये इंटरनेट एक्सप्लोरर मोड (IE Mode) प्रदान करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने इंटरनेट एक्सप्लोररवर आधारित वेबसाईट्स आणि अॅप्लिकेशन्स थेट मायक्रोसॉफ्ट एजच्या माध्यमातून वापरता येणार आहेत. जे लोक अद्यापही इंटरनेट एक्सप्लोरर वापरतात, त्यांना कंपनीने १५ जून २०२२ च्या आधी मायक्रोसॉफ्ट एजचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सर्च बॉक्समध्ये सर्च केल्यानंतर तुमच्या कम्प्युटर अथवा लॅपटॉपवर मायक्रोसॉफ्ट एज सहज उपलब्ध होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.