TRAI Chakshu : सायबर गुन्हेगारी अन् फ्रॉड कॉल्सना रोखण्यासाठी येतोय चक्षु; TRAI ने लाँच केले पोर्टल,अशी करा तक्रार

Fraud Calls : डिजिटल युगात वाढत्या सायबर फसवणुकीमुळे आज प्रत्येकजण त्रासला आहे.आता 'चक्षु' तुमच्या मदतीला येतोय.
Use TRAI's 'Chakshu' Portal to Report Scam Calls and Messages
Use TRAI's 'Chakshu' Portal to Report Scam Calls and Messagesesakal
Updated on

Cyber Fraud : डिजिटल युगात वाढत्या सायबर फसवणुकीमुळे आज प्रत्येकजण त्रासला आहे.आता 'चक्षु' तुमच्या मदतीला येतोय. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण (TRAI) ने नुकतेच 'चक्षु' (Chakshu) नावाचे एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही संशयास्पद वाटणारे फोन नंबर, एसएमएस किंवा अगदी WhatsApp मेसेजही रिपोर्ट करू शकता. 'चक्षु' म्हणजे हिंदीमध्ये 'डोळा' असा अर्थ होतो.

बँकेचे बनावटी कॉल, क्रेडिट कार्डबाबत फसवणूक माहिती, बनावटी ग्राहक सेवा क्रमांक, ऑनलाईन नोकरीच्या फसव्या आमिषांपासून ते गॅस कनेक्शनशी संबंधित फसवणूक यासारख्या विविध फसवणुकींची माहिती तुम्ही चक्षुवर देऊ शकता. तुम्ही दिलेली माहिती ट्राई तपासेल आणि फसवणूक सिद्ध झाल्यास संबंधित क्रमांकावर कारवाई करेल.

Use TRAI's 'Chakshu' Portal to Report Scam Calls and Messages
Email Delete : ईमेल्सचा भडिमार झालाय? आता चिंता नाही, एका क्लिकवर डिलीट करा हवे तेवढे ईमेल,वापरा सोपी ट्रिक

चक्षुवर रिपोर्ट दाखल करण्यासाठी काय करावे लागेल?

  • कोणत्या प्रकारच्या फसवणुकीची माहिती द्यायची आहे ते निवडा (उदा. केवायसी, बनावट ओळख, बनावटी ग्राहक सेवा क्रमांक वगैरे)

  • फसवणूक लक्षित करणारे स्क्रीनशॉट किंवा इमेजेस असतील तर त्या जोडा (अति आवश्यक नाही)

  • फसवणूक झालेल्या तारीख-वेळेची माहिती द्या आणि थोडक्यात घडलेल्या प्रकाराची माहिती लिहा.

  • तुमची वैयक्तिक माहिती जसे नाव आणि फोन नंबर द्या (फसवणूक रोखण्यासाठी)

  • दिलेल्या फोन नंबरवर येणारा OTP टाकून रिपोर्ट सबमिट करा.

Use TRAI's 'Chakshu' Portal to Report Scam Calls and Messages
Sunita Williams Space Mission: सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल नासाने दिली खुशखबर! फक्त एवढ्या दिवसात पृथ्वीवर परतणार अंतराळवीर

चक्षु फसवणूक रोखण्यासाठी आहे. आर्थिक सायबर गुन्हेगारी ऑनलाईन फसवणूक ज्यात तुमच्या पैशावर परिणाम होतो असे झाल्यास 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.