CrimeGPT AI : पोलीस दलामध्ये दाखल झालाय एआय ऑफिसर; प्रश्न विचारणार अन् चुटकीसरशी गुन्हेगार ओळखणार

AI Use in Police Department : पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी एआयचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. "क्राईम जीपीटी" हे नवीन एआय टूल स्टॅकू टेक्नोलॉजीज या कंपनीने तयार केले आहे.
Staqu Technologies Launches Crime GPT AI Assistant For Police
Staqu Technologies Launches Crime GPT AI Assistant For Policeesakal
Updated on

Crime GPT : गुन्हेगारी रोखणं आणि गुन्हे शोधणं ही भारतासहित जगभरातील प्रत्येक देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आधीच्या काळात गुन्हे रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी फक्त माणसाच्या तर्कशक्ती आणि मर्यादित माहितीवर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे गुन्हे रोखण करणे आणि शोधणे हे खूप कठीण आणि वेळ घेणारे होते.

पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता (ai) क्षेत्रातील प्रगतीमुळे गुन्हे रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी नवीन आणि वेगवान मार्ग प्रशस्त झाला आहे. आता गुन्हेगारी रोखण्यासाठी माहितीवर आधारित आणि निर्देशित पद्धती वापरता येणे शक्य आहे.

आधीच्या काळात गुन्हेगारी रोखण्यासाठी सोसायटीची राखण, चेकिंग आणि गस्त अशा पद्धती वापरल्या जात होत्या. याशिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे, गुन्हेगारी नकाशे आणि लोकेशन ट्रॅकिंगसारख्या पद्धतीही वापरल्या जात होत्या. पण या सर्व पद्धती खूप वेळ घेणार्‍या होत्या.

Staqu Technologies Launches Crime GPT AI Assistant For Police
Moshi Chatbot: आता ChatGPT ला टक्कर द्यायला आलाय 'मोशी'; फक्त आवाज ओळखून देणार हवी ती माहिती

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या मदतीने मशीन लर्निंग आणि कॉम्प्युटर व्हिजनसारख्या उप-क्षेत्रांचा वापर करून गुन्हे रोखण आणि गुन्हे शोधणामध्ये क्रांती आणता येऊ शकते. मशीन लर्निंग अल्गोरिदम मोठ्या प्रमाणात माहिती प्रक्रिया करून भविष्यातील गुन्हेगारी कार्यांचा अंदाज लावू शकतात. त्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना मदत होते. तसेच, कॉम्प्युटर व्हिजन मॉडेल सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या व्हिडिओ डाटाचा विश्लेषण करून गुन्हे ओळखू शकतात आणि त्यावर कारवाई करण्यासाठी मदत करू शकतात.

गुन्हे रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी पोलिसांच्या कामकाजात एआयचा वापर केल्याने समाजाची सुरक्षा वाढण्यास मदत होईल. गुन्हे शोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित कार्यक्षम चौकट आणि मॉडेल विकसित करून सार्वजनिक सुरक्षा वाढवता येऊ शकते.

Staqu Technologies Launches Crime GPT AI Assistant For Police
ChatGPT Update : AIच्या दुनियेत OpenAI ने सगळ्यांना टाकले मागे; स्वस्त आणि शक्तिशाली 'ChatGPT 4.o Mini' लाँच करत रचला इतिहास

गुन्हेगारी रोखण्यासाठी क्राईम जीपीटी (CrimeGPT)

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या क्षेत्रात मोठी विकासाची लहर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी एआयचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. "क्राईम जीपीटी" हे नवीन एआय टूल स्टॅकू टेक्नोलॉजीज या कंपनीने तयार केले आहे. हे टूल गुन्हेगारांची डिजिटल माहिती वापरून पोलिसांना गुन्हे शोधनासाठी मदत करणार आहे.

Staqu Technologies Launches Crime GPT AI Assistant For Police
AI Diet Plan : वजन वाढवायचंय का कमी करायचंय? घरबसल्या बजेटमध्ये बनवा तुमचा डायट प्लॅन; मिनिटांत वापरुन बघा 'हे' AI टुल

रिपोर्ट्सनुसार, क्राईम जीपीटी लिहिलेल्या किंवा बोललेल्या प्रश्नांच्या आधारे एखाद्या व्यक्तीची माहिती त्वरित शोधू शकते. क्राईम जीपीटी चेहरे आणि आवाज ओळखणे आणि गुन्हेगारी टोळ्यांचे विश्लेषण करण्यासारख्या वैशिष्ट्यांच्या मदतीने गुन्हे शोधणे सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.