iOS 16 Update मध्ये कोणते फीचर्स मिळणार, येथे जाणून घ्या सविस्तर

ios 16 update these features are going to be found in ios 16 check all detail
ios 16 update these features are going to be found in ios 16 check all detail
Updated on

Apple आजपासून iPhone वापरकर्त्यांना iOS 16 चे अपडेट देणार आहे. Apple ची ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे. Apple ने यावर्षी 6 जून रोजी iOS 16 लाँच केले होते आणि आता कंपनी आजपासून आपल्या यूजर्सना हे नवीन सॉफ्टवेअर अपडेट द्यायला सुरुवात करत आहे. Apple ने iOS 16 मध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत, ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

iOS 16 ची खास फीचर्स जाणून घ्या

LockScreen - iOS 16 मध्ये लॉकस्क्रीन आता अधिक वैयक्तिक, सुंदर आणि उपयुक्त झाली आहे. यामध्ये वापरकर्ते वेगवेगळ्या स्टाईल आणि रंगांमध्ये तारीख आणि वेळ बदलू शकतात. वापरकर्त्याच्या वॉचचा फॉन्ट बदलताच अॅपल वॉचच्या स्टाइलसारखे विजेट्स दिसतात. यामुळे ही माहिती मिळवणे जसे की कॅलेंडर इव्हेंट, हवामान, बॅटरी, अलार्म, टाइम झोन आणि बरेच काही सोपे होते.

Focus Mode - आता फोकस मोड लॉक स्क्रीनवर देखील विस्तारेल. याचा अर्थ वापरकर्ते आता लॉक स्क्रीन वॉलपेपर आणि विजेट्स त्यांच्या फोकस मोडशी मॅच करु शकतात. तसेच फोकस फिल्टर अॅप्समध्ये देखील वापरु शकता. याचा अर्थ वापरकर्ते सफारी ब्राउझरमधील कंटेन्ट फिल्टर देखील करू शकतात. मेसेज, कॅलेंडर, मेलमध्येही फिल्टर फीचर देण्यात आले आहे.

ios 16 update these features are going to be found in ios 16 check all detail
शाओमी फोनच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू? यूट्यूबरने शेअर केले धक्कादायक फोटो

Apple Messages - Apple Messages मध्ये प्रथमच Edit बटण असेल. ट्विटरच्या आधी अॅपलने हे फीचर आपल्या यूजर्सना दिले आहे. वापरकर्त्यांना संदेश पाठवून तो अनडू करण्याचा पर्याय देखील मिळेल.

icloud - यावेळी icloud Shared Photo Library चे नवीन फीचर आले आहे. ही एक नवीन प्रकारची icloud लायब्ररी आहे, जी सहा लोकांपर्यंत शेअर केली जाऊ शकते. इतर फीचर्समध्ये स्मार्ट अपलोड फिल्टर, शेअर केलेल्या लायब्ररीमध्ये फोटो त्वरित पाठवण्यासाठी कॅमेरा अॅपमधील एक नवीन बटण देण्यात आले आहे.

Safety Check - नवीन अपडेटमध्ये यूजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी यावेळी सेफ्टी चेकच्या नावाने आणखी एक फीचर देण्यात आले आहे. यासह, एक पूर्णपणे नवीन होम अॅप दिले आहे ज्यामध्ये अगदी नवीन यूजर इंटरफेस आणि नवीन कॅटगरी देण्यात आली आहे. Apple नवीन स्मार्ट होम स्टँडर्ड घेऊन येत आहे. Apple म्हणणे आहे की, हे सर्व प्लॅटफॉर्मवर काम करेल. नवीन होम अॅपला नवीन इंटरफेस मिळतोय. त्यात हवामान, लाईट इत्यादी नवीन कॅटगरी देण्यात आल्या आहेत.

ios 16 update these features are going to be found in ios 16 check all detail
Vivo ने भारतात लॉंच केला स्वस्त स्मार्टफोन; मिळतो 50MP चा दमदार कॅमेरा

Workout App - वर्कआउट अॅपमध्ये एक नवीन अपडेट देखील देण्यात आले आहे. आता तुमच्या धावण्याचा चांगल्या प्रकारे ट्रॅक घेण्यासाठी तीन नवीन प्रकारचे रनिंग मेट्रिक्स दिले आहेत. फिटनेस अॅप सर्व आयफोन वापरकर्त्यांसाठी विस्तारत आहे. याचा अर्थ असा की ते यापुढे Apple वॉचसाठी एक्सक्लूसिव्ह राहणार नाही. वापरकर्त्यांना Apple वॉचशिवाय त्यांचा फिटनेस राखणे सुरू ठेवता येणार आहे.

Apple Maps - मल्टिस्टॉप रुटिंग सादर करत आहे, त्यामुळे वापरकर्ते 15 स्टॉपपर्यंत आगाऊ योजना आखू शकतात आणि Mac ते iPhone पर्यंत मार्ग स्वयंचलितपणे sync करू शकतात. Apple Maps वापरकर्त्यांसाठी ट्रान्झिट अपडेट देखील आणत आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासासाठी किती खर्च येईल हे पाहणे सोपे होते. वॉलेटमध्ये ट्रान्झिट कार्ड जोडणे, बॅलेंस तपासण्याची आणि ट्रान्झिट कार्ड पुन्हा भरण्याची सुविधा maps न सोडता उपलब्ध आहे.

ios 16 update these features are going to be found in ios 16 check all detail
जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.