Apple Mobile : IPhone 13 मिळणार स्वस्त! ‘अशी’ आहे ऑफर

तुम्हाला Apple चा हा 5G फोन घ्यायचा असेल, तर एक चांगली संधी आहे.
Apple iPhone
Apple iPhone google
Updated on

Apple iPhone 13 फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर नुकत्याच झालेल्या दिवाळी सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला होता. आता Apple iPhone 13 ची विक्री संपली आहे. तुम्हाला Apple चा हा 5G फोन घ्यायचा असेल, तर एक चांगली संधी आहे. Apple iPhone 13 च्या किमतीत नुकतीच कपात झाली आहे. तुम्ही आता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ऍपल स्टोअरवरून कमी किमतीत iPhone 13 ची खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टवर iPhone 13 ची किंमत :

128 GB स्टोरेजसह iPhone 13 चा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 66,990 रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरसह तुम्हाला या iPhone वर 18,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय, फ्लिपकार्टवर अनेक बँक ऑफर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला iPhone 13 अधिक स्वस्तात मिळेल.

अॅमेझॉन वर  iPhone 13 ची किंमत :

आयफोन 13 चा बेस व्हेरिएंट Amazon वर 66,990 रुपयांना लिस्ट झाला आहे. अॅमेझॉन (Amazon India) वर एक्सचेंज ऑफरमध्ये हँडसेट घेण्याचीही संधी आहे. फ्लिपकार्ट प्रमाणेच अॅमेझॉन वर निवडक बँकांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून देखील कॅशबॅक मिळू शकतो.

Apple iPhone
Twitter CEO : ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी आणणार नवं 'ट्विटर', केली मोठी घोषणा

दुसरीकडे Apple Store सारख्या इतर प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास Apple iPhone 13 हा 69,990 रुपयांमध्ये मिळेल.

गेल्या वर्षी आलेल्या iPhone 13 मध्ये नवीन iPhone 14 सारखेच फिचर्स आहेत. पण iPhone 14 मध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश केला गेला आहे. iPhone 13 मध्ये 6.1 इंच OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हा iPhone A15 बायोनिक चिपसेटसह येतो. हाच प्रोसेसर लेटेस्ट iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये देण्यात आला आहे. iPhone 13 मध्ये मागील बाजूस 12 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. iPhone 13 हा 5G फोन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.