'iPhone 15' लाँचसाठी सज्ज, तर 'iPhone 13' झाला स्वस्त! फ्लिपकार्ट-अमेझॉनवर किती आहे किंमत?

iPhone Price Drop : अ‍ॅपलचा नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सची किंमत कमी होण्याचा प्रकार दरवर्षीच दिसून येतो.
iPhone Price Drop
iPhone Price DropeSakal
Updated on

अ‍ॅपलचा नवीन आयफोन हा काही दिवसांमध्येच लाँच होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये इतर काही उत्पादनांसोबत iPhone 15 सीरीज देखील लाँच होणार आहे. यामुळे आयफोनच्या जुन्या मॉडेल्सची किंमत कमी झाली आहे.

अ‍ॅपलचा नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सची किंमत कमी होण्याचा प्रकार दरवर्षीच दिसून येतो. सध्या iPhone 13 या मॉडेलची किंमत कमी झाली आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर हा आयफोन 58,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर फ्लिपकार्टवर हा फोन घेतल्यास 2000 रुपयांचा HDFC बँक कार्ड डिस्काउंटही मिळत आहे.

iPhone Price Drop
Apple iPhone 15 Launch : अखेर प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लाँच होणार नवा आयफोन; अ‍ॅपलने केलं कन्फर्म

किती आहे खरी किंमत?

iPhone 13 ची किंमत खरंतर 69,990 रुपये आहे. मात्र, सध्या नवीन आयफोन येणार असल्यामुळे या फोनवर सुमारे 10 हजारांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर यासोबतच एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल, तर आणखी कमी किंमतीत तुम्ही नवा आयफोन 13 घेऊ शकता.

कोणता फोन घेणं उत्तम?

तुम्हाला चांगले फीचर्स असणारा आयफोन स्वस्तात हवा असेल, तर तुम्ही नक्कीच आयफोन 13 हा पर्याय निवडू शकता. मात्र, तुमचं बजेट जास्त असेल; तर आयफोन 15 साठी थांबणं अधिक योग्य ठरेल. iPhone 15 मध्ये कित्येक तगडे फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त तुम्ही नवा आयफोन लाँच होण्याची वाटही पाहू शकता, त्या नंतर कदाचित iPhone 14 किंवा 12 च्या किंमतीही खाली घसरू शकतात.

iPhone Price Drop
iPhone 15 Features : लाँचची तारीख जाहीर झाली अन् काही तासांतच 'आयफोन 15' चे फीचर्स लीक! जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.