iPhone Display Issues: टेक कंपनी अॅपलने काही महिन्यांपूर्वीच आपल्या लेटेस्ट iPhone 14 सीरिजला लाँच केले आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हँडसेटचा समावेश आहे. परंतु, आता यूजर्सला आयफोन वापरताना समस्या येत आहे. रिपोर्टनुसार, डिव्हाइसला सुरू केल्यावर स्क्रीनवर हॉरिझेन्टल लाइन दिसत आहे.
अनेक आयफोन यूजर्सने सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली आहे. यूजर्सच्या तक्रारीनंतर आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. Apple नुसार ही समस्या हार्डवेअरशी संबंधित नसून, iOS बगमुळे आडवी रेष दिसत आहे. कंपनी लवकरच यासाठी सॉफ्टवेअर अपडेट जारी करण्याची शक्यता आहे.
iPhone 14 Pro आणि Pro Max यूजर्सने तक्रार केलीये की, डिव्हाइसला सुरू केल्यावर स्क्रीनवर एक आडवी रेष दिसत आहे. काही वेळानंतर ही रेष गायब होते. अनेकजणांनी Apple Stores मध्ये देखील धाव घेतली. काही यूजर्सनुसार, लेटेस्ट iOS १६.२ अपडेटमुळे ही समस्या आली असण्याची शक्यता आहे. तर काही यूजर्सनुसार iOS 16 व्हर्जनपासूनच ही समस्या आहे.
रिपोर्टनुसार, ही समस्या फार मोठी नाही. असे असले तरी अनेक यूजर्स यामुळे घाबरले आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी काही यूजर्सने उपाय देखील सांगितले आहेत. मॅन्यूअली फोनला बंद करून पुन्हा रिस्टार्ट केल्यावर समस्या दूर होईल, असे यूजर्सने म्हटले आहे.
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
दरम्यान, Apple च्या सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्हने रेडिटवर याबाबत माहिती दिली आहे. कंपनी ही समस्या सोडवण्यासाठी लवकरच अपडेट जारी करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, ही हार्डवेअरशी संबंधित समस्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.