आज रात्री ॲपल त्यांच्या आयफोन सिरीजमधील iphone 14 max लाँच करणार आहे. हा कार्यक्रम रात्री 10.30 वाजता ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. iPhone 14 सीरीज मध्ये Apple iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra लॉन्च होतील. iPhone 14 सीरीज अंतर्गत येणारा हा iPhone 14 Max हा प्रीमियम फोन असेल आणि त्यात अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. याशिवाय Apple Watch 8, Watch 8 Pro आणि iPad देखील लाँच करण्यात येणार आहे. तसेच बजेट आयपॅडही सुद्धा लाँच होण्याची शक्यता आहे.
आता आयफोन म्हटलं की लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या सिरीजमध्ये ॲपल काय काय देणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली असेल. चला तर मग जाणून घेऊ यात नेमके कोणकोणते फीचर्स आहेत.
iphone 14 max मध्ये असलेले फीचर्स
आयफोन 14 मॅक्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झालंच तर यात मोठा स्क्रीन डिस्प्ले दिला जाईल, जो आयफोन 14 पेक्षा जास्त असेल. यात फारसे बदल केले जाणार नाहीत. हा डिस्प्ले 6.7-इंचाचा असल्याची माहिती मिळते. यामध्ये iPhone 14 प्रमाणेच स्पेसिफिकेशन असतील. या फोनमध्ये 90 Hz चा रिफ्रेश रेट दिसतो. तसेच इनहाऊस तयार झालेली A15 चिपसेट सुद्धा यात वापरली जाईल.
याची फोनची किंमत iPhone 13 च्या किंमतीच्या आसपास असू शकते. याची स्टार्टींग रेंज 80 ते 85 हजार रुपये इतकी आहे. मीडियामध्ये जे रिपोर्ट्स लीक झालेत यावरून ही माहिती समोर आली आहे.
स्मार्टवॉच पहिल्यापेक्षा दर्जेदार
या स्मार्ट वॉचमध्ये ॲपलची स्वतःची जीपीएस सिस्टीम असू शकते. यात फिटनेस ट्रॅकिंग, सेन्सर, स्क्रीन प्रोटेक्शन पाहायला मिळणार आहे. पण या सगळ्या प्रोडक्टची अधिकृत किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेण्यासाठी आज रात्री पर्यंत वाट पाहावीच लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.