iPhone 15 : 'आयफोन 15'चे चार नाही तर पाच मॉडेल लाँच होणार? 'मॅक्स प्रो' आणि 'अल्ट्रा' दोन्ही येण्याची शक्यता

New iPhone Launch : 12 सप्टेंबर रोजी एका इव्हेंटमध्ये अ‍ॅपल आपली नवी उत्पादनं लाँच करणार आहे.
iPhone 15 Ultra
iPhone 15 UltraeSakal
Updated on

आयफोन 15 लाँच होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 12 सप्टेंबर रोजी एका इव्हेंटमध्ये अ‍ॅपल आपली नवी उत्पादनं लाँच करणार आहे. यामध्ये नव्या आयफोनचे चार नाही तर पाच व्हेरियंट लाँच केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अ‍ॅपल गेल्या काही वर्षांपासून आपला नवा आयफोन विविध प्रकारच्या व्हेरियंटमध्ये लाँच करत आहे. मॅक्स, प्रो, प्रो मॅक्स असे हे विविध व्हेरियंट असतात. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा सुरू होत्या, की अ‍ॅपल यावेळी आयफोन 15 च्या प्रो मॅक्स मॉडेल ऐवजी अल्ट्रा हे मॉडेल लाँच करेल.

iPhone 15 Ultra
iPhone 15 Features : लाँचची तारीख जाहीर झाली अन् काही तासांतच 'आयफोन 15' चे फीचर्स लीक! जाणून घ्या

मात्र, आता काही टिपस्टर्स आणि सोशल मीडिया यूजर्स असा दावा करत आहेत; की अ‍ॅपल iPhone 15 चे प्रो मॅक्स आणि अल्ट्रा हे दोन्ही व्हेरियंट लाँच करणार आहे. म्हणजेच यावेळी iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro Max आणि iPhone 15 Ultra असे पाच व्हेरियंट लाँच करणार असल्याची शक्यता आहे.

असा असेल फरक

iPhone 15 Pro Max या मॉडेलमध्ये 6GB रॅम आणि 1TB पर्यंतचे स्टोरेज देण्यात येऊ शकतं. तर, याच्या Ultra मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 2TB स्टोरेज ऑप्शन दिला जाऊ शकतो. यासोबतच, अल्ट्रा मॉडेलमध्ये अधिक चांगला कॅमेरा दिला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

iPhone 15 Ultra
'iPhone 15' लाँचसाठी सज्ज, तर 'iPhone 13' झाला स्वस्त! फ्लिपकार्ट-अमेझॉनवर किती आहे किंमत?

आयफोन 15च्या अल्ट्रा मॉडेलची किंमत ही प्रो मॅक्सच्या तुलनेत 100 डॉलर्सने अधिक असू शकते असंही टिपस्टर्स म्हणत आहेत. आतापर्यंत लीक झालेल्या माहितीनुसार, iPhone 15 Pro Max ची किंमत 1,299 डॉलर्स एवढी असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()