iPhone 15 Charging : घ्या! 'आयफोन 15'चा आणखी एक इश्यू समोर; पॉवर बँकने चार्ज होण्यास अडचण - रिपोर्ट

iPhone 15 Overheating : आयफोनच्या प्रो मॉडेल्सना ओव्हरहीटिंगचा इश्यू येत असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत.
iPhone 15 Charging
iPhone 15 ChargingeSakal
Updated on

अ‍ॅपलने 12 सप्टेंबर रोजी आयफोन-15 सीरीज लाँच केली होती. या सीरीजचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये देण्यात आलेला टाईप-सी चार्जिंग पोर्ट. युरोपियन युनियनच्या दबावानंतर पहिल्यांदाच अ‍ॅपलने आपल्या आयफोनमध्ये लाईटनिंग पोर्ट ऐवजी यूएसबी-सी पोर्ट दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच नवीन iPhone 15 सीरीज ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. यूएसबी-सी पोर्टमुळे आता अँड्रॉईडच्या चार्जिंग केबलनेही आयफोन चार्ज होईल असं म्हटलं जात आहे. मात्र, कंपनीने ग्राहकांना असं न करण्याचा इशारा दिला आहे.

iPhone 15 Charging
iPhone 15 Heating : 'आयफोन 15'चे प्रो मॉडेल्स होतायत ओव्हरहीट; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

ग्राहकांच्या तक्रारी

आयफोन 15 सीरीज लाँच झाल्यापासूनच मोठ्या वादात सापडली आहे. या सीरीजमधील iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या दोन्ही मॉडेलना ओव्हरहीटिंगचा इश्यू येत असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. यातच आता या सीरीजमधील फोनचा आणखी एक प्रॉब्लेम समोर आला आहे.

पॉवर बँकचा इश्यू

मॅकरुमर्सने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 15 सीरीजमधील फोन हे पॉवर बँकने चार्ज करताना अडचण येत आहे. अ‍ॅपल वॉच आणि अ‍ॅपल एअरपॉड्स या डिव्हाईसेसना देखील पॉवर बँकने चार्ज करताना अशीच अडचण येत असल्याचं समोर आलं आहे.

केवळ टाईप-सी पोर्ट असणाऱ्या पॉवर बँकचा वापर करताना अडचण येत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाईप-ए आउटपुट असणाऱ्या पॉवर बँकचा वापर केल्यास, किंवा डायरेक्ट चार्जिंग केल्यास अडचण येत नसल्याचं मॅकरुमर्सने स्पष्ट केलं आहे.

iPhone 15 Charging
iPhone 15 in Pakistan : पाकिस्तानात किती रुपयांना मिळतोय आयफोन? एवढ्यात तर येईल टाटाची 'ही' कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.