अॅपलचा वार्षिक इव्हेंट काल (12 सप्टेंबर) पार पडला. यामध्ये कित्येक नव्या प्रॉडक्ट्सची घोषणा करण्यात आली. मात्र, यामध्ये मुख्य आकर्षण ठरला iPhone 15. या सीरीजमधील चार मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. अपेक्षेप्रमाणे यामध्ये कित्येक मोठे अपडेट्स देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन-15 सीरीजमधील फोन तुम्ही 15 सप्टेंबरपासून प्री-बुक करू शकाल. या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता याची बुकिंक सुरू होईल. 22 सप्टेंबरपासून हे भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.
iPhone 15 च्या 128GB मॉडेलची किंमत भारतात 79,900 रुपये आहे. तर 256GB व्हेरियंटची किंमत 89,990 रुपये आहे. यातील हाय-एंड 512GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 1,09,900 रुपये आहे.
iPhone 15 Plus च्या 128GB व्हेरियंटची किंमत 89,900 रुपये आहे. 256GB व्हेरियंटची किंमत 99,900 रुपये आहे. तर, यातील हाय-एंड 512GB व्हेरियंटची किंमत 1,19,900 रुपये आहे.
आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस हे मॉडेल पाच कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लू, पिंक, येलो, ग्रीन आणि ब्लॅक हे पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर, यातील प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे.
iPhone 15 Pro मॉडेलच्या 128GB बेस व्हेरियंटची किंमत 1,34,900 रुपये आहे. तर, 256GB व्हेरियंटची किंमत 1,44,900 रुपये आहे. 512GB व्हेरियंटची किंमत 1,64,900 एवढी आहे. यामध्ये 1TB व्हेरियंट देखील उपलब्ध आहे, ज्याची भारतात किंमत 1,84,900 रुपये आहे.
iPhone 15 Pro Max याचं बेस मॉडेलच 256GB स्टोरेज ऑप्शनसह मिळेल. याची किंमत भारतात 1,59,900 रुपये आहे. तर, 512GB व्हेरियंटची किंमत 1,79,900 रुपये आहे. हाय-एंड 1TB व्हेरियंटची किंमत 1,99,900 रुपये आहे.
आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स या दोन्हीमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये नॅचरल टायटेनियम, ब्लू टायटेनिमय, ब्लॅक टायटेनियम आणि व्हाईट टायटेनियम असे चार कलर ऑप्शन्स मिळतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.