iPhone 15 Price Drop : खुशखबर! iPhone 15 वर मिळतोय आजवरचा महा डिस्काउंट; चक्क 39,600 रुपयांची सूट,कुठे खरेदी कराल? एकदा बघाच

iPhone 15 Discounted by Rs 16,601 on Flipkart Ahead of iPhone 16 Series : नुकत्याच येऊ घातलेल्या iPhone 16 सीरीजच्या लाँचपासून अगदी काही दिवस आधी iPhone 15 स्मार्टफोनवर जबरदस्त सूट मिळत आहे.
iPhone 15 Discounted by Rs 16,601 on Flipkart Ahead of iPhone 16 Series
iPhone 15 Discounted by Rs 16,601 on Flipkart Ahead of iPhone 16 Seriesesakal
Updated on

iPhone 15 Flipkart Discount Offer : आयफोनच्या प्रेमींच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नुकत्याच येऊ घातलेल्या iPhone 16 सीरीजच्या लाँचपासून अगदी काही दिवस आधी iPhone 15 स्मार्टफोनवर जबरदस्त सूट मिळत आहे. फ्लिपकार्टवर सध्या तब्बल 16,601 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा देखील फायदा घेतल्यास तुम्ही iPhone 15 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

9 सप्टेंबरला ॲपल आपली नवी आयफोन 16 सीरीज लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये तब्बल 4 नवीन आयफोन मार्केटमध्ये येणार आहेत. त्यामुळे आत्ताच्या जनरेशनच्या आयफोनच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. जर तुम्ही नवीनतम आयफोन 15 घेण्याचा विचार करत असाल तर ही एक सुवर्णसंधी आहे.

सध्या विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आयफोन 15 वर मोठी सूट मिळत आहे. विशेष म्हणजे 128GB व्हेरियंट आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे खरेदी केल्यास थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही अधिक बचत करू शकता. चला तर मग आयफोन 15 वरील नवीनतम डिस्काउंट ऑफरवर एक नजर टाकुया.

iPhone 15 Discounted by Rs 16,601 on Flipkart Ahead of iPhone 16 Series
Smartphone Tips : पासवर्डविना मोबाईल स्विच ऑफ करता येणारच नाही, 'ही' कमाल सेटिंग आहे खूपच फायद्याची,एकदा सुरू कराच

फ्लिपकार्टवर आयफोन 15 वर जबरदस्त सूट

फ्लिपकार्टवर सध्या आयफोन 15 चा 128GB व्हेरियंट 79,600 रुपये इतक्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. कंपनी सध्या या व्हेरियंटवर तब्बल 20 टक्के इतकी मोठी सूट देत आहे. या ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्ही ही फोन फक्त 62,999 रुपये इतक्या किमतीमध्ये खरेदी करू शकता.

iPhone 15 Discounted by Rs 16,601 on Flipkart Ahead of iPhone 16 Series
Redmi New Smartphone : Redmiच्या ब्रँड स्मार्टफोनची भारतात एंट्री; 7000 रुपयांपेक्षा कमी किंमत,फीचर्स अन् कॅमेराही एकदम खास

या ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्ही 16,000 रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता. याशिवाय फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक देखील मिळवू शकता. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करून तब्बल 39,600 रुपयांपर्यंत बचत करू शकता. बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह तुम्ही आयफोन 15 आणखी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()