iPhone 16 Series Sale : आयफोनचा सेल आजपासून सुरू; मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी झुंबड,काय आहेत iPhone 16 स्पेशल डिस्काउंट ऑफर्स?

iphone 16 series sales today Offers : मुंबई आणि दिल्लीमधील अधिकृत अ‍ॅपल स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन आणि थर्ड-पार्टी रिटेलर्सद्वारे विक्री सुरू होत असताना, मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी झुंबड झाली आहे.
iPhone 16 Series Sale Today Offers
iPhone 16 Series Sale Today Offersesakal
Updated on

iPhone 16 Sale Discount Offers : अ‍ॅपलची बहुचर्चित iPhone 16 मालिका - iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मुंबई आणि दिल्लीमधील अधिकृत अ‍ॅपल स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन आणि थर्ड-पार्टी रिटेलर्सद्वारे विक्री सुरू होत असताना, मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी झुंबड झाली आहे.

यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज नेमक्या कोणत्या ऑफर्स आहेत ज्यामुळे iPhone 16 खरेदीसाठी एवढी गर्दी लोटली आहे. जर तुम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि किफायतशीर पर्याय शोधत असाल तर हो तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

iPhone 16 सिरीज, ज्याची किंमत रु. 79,900 पासून सुरू होते, भारतीय बाजारपेठेत धडाकेदार पदार्पण करण्यास सज्ज आहे. ही मालिका ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. तुम्ही कमी किंमतीत iPhone 16 सिरीज कशी खरेदी करू शकता, ते जाणून घ्या.

iPhone 16 Series Sale Today Offers
Samsung Discount Offer : सॅमसंगच्या 5G स्मार्टफोन्सवर मिळतोय चक्क 17 हजारांचा डिस्काउंट; काय आहे खास ऑफर? बघाच

जगभरात प्रदर्शनानंतर 2 आठवड्यांनी, iPhone 16 मालिका विक्रीसाठी येण्यास सज्ज आहे. 9 सप्टेंबर रोजी लाँच झालेली ही सिरीज 4 स्मार्टफोन्ससह येते. त्यामध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. ही मालिका भारतातील दोन अधिकृत Apple स्टोअर्स (मुंबई आणि दिल्ली) आणि Amazon, Flipkart, Croma इत्यादी इतर थर्ड-पार्टी रिटेलर्सकडून खरेदीसाठी उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही आयफोन घ्यावा का? आणि तुम्ही सर्वात कमी किंमत कशी मिळवू शकता?

iPhone 16 Series Sale Today Offers
Whatsapp Status Mention Feature : व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फीचर पाहिलत काय? स्टेटसमध्ये मित्रांना करा मेंशन अन् रिशेअर,कसं वापराल? एकदा बघाच

iPhone 16: भारतातील किंमत आणि ऑफर्स

भारतात, iPhone 16 ची किंमत रु. 79,900 आहे आणि iPhone 16 Plus रु. 89,900 मध्ये उपलब्ध असेल. दुसरीकडे, iPhone 16 Pro भारतात रु. 1,19,900 च्या सुरुवाती किंमतीसह येतो. सर्वात प्रीमियम, iPhone 16 Pro Max ची किंमत भारतीय बाजारपेठेत रु. 1,44,900 असेल. पण तुम्ही ते कमी किंमतीत मिळवू शकता.

iPhone 16 खरेदीदार अमेरिकन एक्सप्रेस, एक्सिस बँक आणि आयसीआयसी बँक कार्ड वापरून रु. 5000 पर्यंत त्वरित सूट आणि प्रमुख बँकांकडून 3-6 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI पर्याय लाभ घेऊ शकतात.

जुन्या आयफोनवर चांगली डील

तुम्ही iPhone वापरकर्ता असाल तर, तुम्ही Apple Trade-in ऑफर्सद्वारे चांगली डील मिळवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही जर iPhone 13 वापरकर्ता असाल तर, तुमचे डिव्‍हाइस बदलून रु. 25,000 पर्यंत सूट मिळवू शकता. Apple तुमच्या जुन्या डिव्‍हाइस बदलण्यासाठी रु. 4000 ते रु. 67,500 पर्यंत सूट देत आहे. ही सूट थेट नवीन iPhone 16 खरेदी करताना वापरता येते आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन देखील पूर्ण केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.