iPhone 16 Price : आला आला आयफोन 16, धमाकेदार फीचर पण भारतात किंमत किती?

iPhone 16 Price in India : आयफोन 16 सिरीज लॉन्च आली आहे. त्याची किंमत आणि उपलब्धता जाणून घ्या.
iPhone 16 Price
iPhone 16 Priceesakal
Updated on

कंपनीने आज ग्लो टाईम इव्हेंट मध्ये आयफोन 16 सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये Apple इंटेलिजन्स खास कॅमेरा कंट्रोल A18 ची आणि यांसारखे अनेक फीचर्स आहेत.

iPhone 16 स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे खालील प्रमाणे आहे :

  • iPhone 16 128 GB - किंमत 65,000 रुपयांपासून सुरू असण्याचा अंदाज आहे.

  • iPhone 16 Plus 128 GB -किंमत सुमारे 73,000 रुपयांपर्यंत सुरू असण्याची शक्यता आहे.

  • iPhone 16 Pro 128 GB किंमत - 1,19,900 रुपयांपासून सुरू असण्याची शक्यता आहे.

  • iPhone 16 Pro Max 256GB किंमत- 1,44,900 रुपयांपासून सुरू असण्याची शक्यता आहे.

13 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर करता येणार आहे. 20 सप्टेंबरपासून iPhone 16 विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

iPhone 16 Price
iPhone 16 लाँचला 2 दिवस बाकी; तोवर धक्कादायक बातमी समोर..ॲपलच्या 'या' 4 सीरिज होणार बंद,फोनच्या सिक्युरिटीवर गंभीर परिणाम

iPhone 16 ची रेग्युलर आणि प्रो अशा दोन्ही आवृत्ती लाँच झाल्या आहेत. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 799 डॉलर (सुमारे 65,000 रुपये) आहे, तर iPhone 16 Plus ची किंमत 899 डॉलर (सुमारे 73,000 रुपये) आहे. ही किंमत मागील मॉडेल्सच्या तुलनेत थोडी वाढलेली आहे, परंतु नवीन A18 चिप, सुधारित कॅमेरा आणि बॅटरी लाइफमुळे ही वाढ योग्य वाटते. याशिवाय, iPhone 16 Pro आणि Pro Max मॉडेल्समध्ये 120Hz प्रोमो डिस्प्ले, प्रो रेज आणि अधिक स्टोरेज ऑप्शन्ससारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांची किंमत अधिक आहे.

iPhone 16 Price
iPhone 16 Launch : इट्स ग्लोटाइम! iPhone 16 सीरिज झाली लाँच; AI फीचर्स अन् कॅमेरा एकदम खास,पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकमध्ये..

iPhone 16 Pro ला 6.3 इंच आणि iPhone 16 Pro Max ला 6.9 इंचा डिस्प्ले मिळतो आहे. बेझेल आकार कमी झाल्यामुळे फोनचा आकार वाढलेला नाही. चार रंगांमध्ये उपलब्ध - काळा, पांढरा, नैसर्गिक आणि डेजर्ट (नवीन caramel सारखा सोनेरी रंग).iPhone 16 Pro मध्ये आतापर्यंतच्या सर्व iPhone पेक्षा सर्वात मोठी बॅटरी आहे.

A18 Pro मध्ये 16 कोर न्यूरल इंजिन, 17% अधिक मेमरी बँडविड्थ आणि 6 कोर GPU आहे. रे-ट्रेसिंग iPhone 15 Pro पेक्षा 2 पट वेगवान आहे. CPU 15% वेगवान आणि 20% अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे.iPhone 16 Pro ला नवीन 48MP फ्यूजन कॅमेरा मिळतो आहे. अल्ट्रावाइड कॅमेरा देखील 48MP चा आहे. सर्व प्रो मॉडेल्सना 12MP टेलीफोटो लेन्स 5x झूमसह मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.