IPhone Battery Drain : आयफोनमध्ये येतोय बॅटरीचा प्रॉब्लेम? अशा पद्धतीने वाढवा बॅटरी लाईफ

आयफोन जुना होऊ लागल्यानंतर बॅटरीची समस्या येऊ लागते
IPhone Battery Drain
IPhone Battery Drainesakal
Updated on

IPhone Battery Drain : आयफोन जुना होऊ लागल्यानंतर बॅटरीची समस्या येऊ लागते. ही एक सामान्य समस्या आहे. सॉफ्टवेअर अपडेट किंवा इतर अनेक कारणांमुळे तुमच्या आयफोनची बॅटरी खूप लवकर संपते. अशावेळी नॉर्मल बॅटरी बॅकअपपेक्षा थोडी जास्त बॅटरी वापरली जाते. अशा परिस्थितीत, आयफोन युजर टेन्शन मध्ये येतात. आणि फोन बदलण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.

IPhone Battery Drain
Health Tips: नाश्त्याला दलिया खाण्याचे फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला

पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा फोन बदलावा लागणार नाही, मात्र तुम्ही आयफोनमध्ये असलेल्या काही फीचर्सच्या मदतीने ही समस्या दूर होऊ शकेल.

तुमच्याकडे iPhone 13 Mini, iPhone 13 Pro, iPhone 11 किंवा इतर कोणतेही मॉडेल असल्यास, बॅटरीचे लाईफ 100 टक्क्यांपर्यंत कशी आणायची किंवा 100 टक्क्यांपेक्षा कमी होण्यापासून कशी वाचवायची यासाठी या टिप्स फॉलो करा.

IPhone Battery Drain
Hair Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी, कोंड्याच्या टेन्शनला करा बाय बाय

आयफोनमध्ये बॅटरी लवकर संपते, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा आयफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट (iOS) येते तेव्हा अॅपल त्या अपग्रेडसह काही नवीन आणि महत्त्वाचे फीचर्स सादर करते. या फीचर्सचा आयफोनच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. हळूहळू जास्त बॅटरी वापरामुळे आयफोनची बॅटरी खराब होण्याचा धोका असतो.

IPhone Battery Drain
Family Cars : मोठ्या कुटुंबासाठी 'या' कार आहेत बेस्ट ऑप्शन

आयफोनची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

1. यासाठी प्रथम आयफोनच्या डिस्प्लेची ब्राइटनेस ॲडजस्ट करा. जास्त ब्राइटनेसमुळे बॅटरी जास्त खर्च होते. याशिवाय ऑटो ब्राइटनेस मोड बंद करा.

2. iPhone मध्ये Raise to Wake फीचर आहे जे डीफॉल्टनुसार काम करते. ते बंद करा.

3. यानंतर तुमच्या iPhone वरून लोकेशन बंद करा

IPhone Battery Drain
Health Tips: काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिताय तर थांबा, होईल नुकसान

4. ज्या अॅपसाठी अपडेट आले आहे ते सर्व अॅप्स अपडेट करा, याचा परिणाम फोनच्या बॅटरीवरही होतो. याशिवाय जे अॅप्स जास्त बॅटरी वापरतात ते वापरू नका.

5. आयफोनवर, सेटिंग्जमध्ये जा आणि बॅटरीवर क्लिक करा, त्यानंतर लो पॉवर मोड पर्यायावर क्लिक करा आणि लो पॉवर मोड चालू करा.

6. या प्रक्रियेचा अवलंब करूनही तुमची समस्या सुटली नाही आणि बॅटरी 85 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला Apple सर्व्हिस सेंटरमधून आयफोनची बॅटरी बदलावी लागेल. यानंतर तुमच्या फोनची बॅटरी पुन्हा 100 टक्के परत येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.