Lockdown Mode : कोणीही हॅक करु शकणार नाही तुमचा आयफोन; फक्त ऑन करा 'लॉकडाऊन मोड'

iPhone Hack : सध्या देशात आयफोनच्या हॅकिंगची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
iPhone Hack Lockdown mode
iPhone Hack Lockdown modeeSakal
Updated on

सध्या देशात आयफोनच्या हॅकिंगची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीच्या काही नेत्यांनी मोदी सरकार आपले आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत अ‍ॅपल कंपनीनेच इशारा दिल्याचं या नेत्यांनी सांगितलं आहे. या सगळ्यात तुमचा आयफोन सुरक्षित ठेवायचा असेल, तर त्यासाठी कंपनीनेच एक खास फीचर दिलं आहे.

अ‍ॅपल कंपनी कायमच आपल्या ग्राहकांच्या गोपनीयतेबाबत सतर्क असते. कित्येक लोक केवळ यूजर सेफ्टी या एका क्वालिटीमुळेच आयफोन खरेदी करतात. आपल्या यूजर्सच्या सुरक्षेसाठी कंपनी कित्येक सिक्युरिटी फीचर्स पुरवते. यातील एक फीचर म्हणजे 'लॉकडाऊन मोड'.

iPhone Hack Lockdown mode
Apple's Gift To Employees : 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अॅपलने आपल्या कर्मचाऱ्याला दिली ही खास भेट, अनबॉक्सिंगचा व्हिडिओ व्हायरल

अ‍ॅपलने 2022 साली iOS 16 सोबत हे फीचर लाँच केलं होतं. कंपनी याला आपलं एक्स्ट्रीम सिक्युरिटी फीचर म्हणते. आयफोनला सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे फीचर लाँच करण्यात आलं आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी अशा काही विशिष्ट लोकांना याची सर्वाधिक गरज भासू शकते, असं कंपनीने म्हटलं आहे. अर्थात, हे फीचर सर्वांसाठीच उपलब्ध आहे.

लॉकडाऊन मोड

हे फीचर ऑन केल्यानंतर तुमचा फोन खरोखरच 'लॉक डाऊन' होतो. यानंतर सफारी (वेब ब्राऊजर), फेसटाईम कॉल तसंच इंटरनेट संबंधी कित्येक अ‍ॅप्स बंद होतात. केवळ कॉल, मेसेज, कॅमेरा, फाईल्स असे अ‍ॅप्स कार्यरत राहतात.

iPhone Hack Lockdown mode
Apple Alert: आयफोन हँकिंगच्या विरोधकांच्या आरोपांना भाजपचं प्रत्युत्तर; चुकीचं काही पाहता...

असं करा सुरू

लॉकडाऊन मोड सुरू करण्यासाठी सर्वात आधी सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर Privacy & Security हा पर्याय निवडा. यानंतर खाली स्क्रोल करुन त्यात Lockdown Mode हा पर्याय शोधा. यावर क्लिक करुन तुमचा पासकोड एंटर केला, की तुमचा आयफोन लॉकडाऊन मोडमध्ये जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.