आपल्याकडे ब्रॅंडेड कंपनीचा ऍन्ड्रॉईड मोबाईल असल्यास समोरील व्यक्तीवर आपला प्रभाव लवकर पडतो. यामुळे अनेकांच्या मनी आयफोन हाताळण्याचा विचार असतो; पण हा मोबाईल महागडा असल्यामुळे अनेकांच्या खिशाला तो परवडणारा नसतो. इच्छा असूनही आयफोन खरेदी करणे शक्य नसते; मात्र आता नागरिकांचे स्वप्न, अपेक्षा सत्यात उतरविण्यासाठी देश, विदेशी कंपन्यांनी स्मार्टफोनचा लूक आता हुबेहूब आयफोनप्रमाणे दिला आहे. यामुळे हे मोबाईल नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत.
आयफोनची किंमत जास्त आहे; पण ग्राहकांच्या मनात त्याची प्रतिमा घर करून आहे; पण अनेकांच्या खिशाला आयफोन परवडणारा नाही. त्यामुळे आता विवो, आयपॅड, रेडमी-3, रेडमी नोट-3, एचटीसी ए-9 यासह अनेक ऍन्ड्रॉईड मोबाईल दिसण्यास व अत्याधुनिक तंत्रज्ञानात आयफोनसारखे आहेत. या मोबाईलच्या किमतीदेखील कमी आहेत. यामुळे हे मोबाईल सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. या मोबाईलचे व्हर्जन, कलर, रॅम, आयफोन सारखेच आहेत. आणखी एक खासियत म्हणजे या मोबाईलचा लूक हुबेहूब आयफोनसरखाच आहे.
विवो, आयपॅड हे मोबाईल खरेदी करून अनेक जण आयफोन वापरत असल्याचा आनंद घेत आहेत. चार चौघांत असे मोबाईल हॅन्डसेट शर्टच्या वरच्या खिशात स्टाइलमध्ये ठेवून समोरच्या व्यक्तीवर इंप्रेशन पाडत आहेत.
|