iPhone वर व्हॉट्सअॅप कॉलिंग सेवा बदलणार

iPhone वर  व्हॉट्सअॅप कॉलिंग सेवा बदलणार
Updated on

आयफोनसाठी आता कंपनी नवीन अपडेटची टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकिंग साइट डब्ल्यूबेटाइन्फोच्या म्हणण्यानुसार, अॅप आयफोनच्या कॉलिंग इंटरफेसची जागा घेणार आहे. व्हॉट्सअॅप बीटा रीलिझ वर्जन 2.21.140.11 Whatsapp कॉलसाठी एक नवीन फेसटाइम-सारखी कॉलिंग फीचर रोल आउट करेल.(iPhone-Whatsapp-calling-service-iPhone-trending-news-akb84)

टेक डेस्क. इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे खासकरुन अँड्रॉइड आणि आयओएसवर वापरले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्स आहे. कंपनी बर्‍याचदा नवीन वापरकर्त्यांसह नविन फिचर आणत असते. याबरोवरच आता कंपनी आयफोनसाठी नवीन अपडेटची चाचणी घेत आहे. व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकिंग साइट डब्ल्यूबेटाइन्फोच्या म्हणण्यानुसार अॅप आयफोनच्या कॉलिंग इंटरफेसची जागा घेणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपची बीटा रिलीज वर्जन 2.21.140.11 व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठी एक नवीन फेसटाइम-सारखी फीचर रोल आउट करेल.

WABetaInfo च्या अहवालानुसार, नवीन कॉलिंग इंटरफेसमध्ये एक नवीन 'रिंग' बटण दिले जाईल जे यूजर्सना परत बॅक करण्यास मदत करेल. याच्याबरोबर अॅप आयफोन यूजर्सना नंतर चालू असलेल्या ग्रुप कॉलमध्ये सामील होण्यास परमिशन देईल. ही सुधारणा आयओएससाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटावर उपलब्ध आहे. मात्र व्हॉट्सअॅप लवकरच या सुविधा अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅप बीटावर लवकरच सुरु करतील.

आपण ग्रुप कॉलमध्ये कधी सामील होऊ शकता?

जर तुम्ही एखाद्या ग्रुप कॉलमध्ये भाग घेण्यासाठी तात्पुरते दुर्लक्ष केल्यास आणि काही काळानंतर पुन्हा व्हॉट्सअॅप उघडल्यास जर ग्रुप कॉल सुरू असेल तर,कॉलमध्ये इतरांना जोडण्याची विनंती न करता व्हॉट्सअॅप आपल्याला त्वरीत कॉलमध्ये सामील होण्यासाठी एक अलर्ट करेल जर तुमची इच्छा असल्यास दूसऱ्या यूजर्स ला रिक्वेस्ट न करता जाॅईन होऊ शकता. तुमचा जेव्हा का्ॅल सुरु असेल तेव्हा कॉल टॅबमध्ये आपण join होण्यासाठी Tap to join बॅनर आणि ज्या ठिकाणी कॉल सुरू त्याठिकाणी चॅटमध्ये “Join call” वापरू शकता.

यासोबत कंपनीने आयओएस बीटा वापरकर्त्यांसाठी (Disappearing messages)फीचर व्ह्यू व्यू वन्स नावाने लॉन्च केले आहे. हे फीचर स्नॅपचॅट प्रमाणे काम करते. हे फीचर अॅक्टिव केल्यानंतर व्हिडिओ आणि फोटो आपोआप गायब होतात.

हे फीचर iOS व्यतिरिक्त अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. जेव्हा हे फीचर अॅक्टिव होते, तेव्हा पाठविलेला संदेश वापरकर्त्याच्या फोनवर तसेच प्राप्तकर्त्याच्या डिव्हाइसवरून आपोआप हटविला जातो. या बरोबरच मेसेज कधी देण्यात आला आणि मेसेज माहिती ऑप्शनवर जाऊन तो कधी पाहिला गेला यासारखी माहितीही वापरकर्त्यांना मिळू शकते. या फीचरमध्ये अनेक त्रुटी आहेत. ज्या सुधारल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.