IPL 2023 Livestream : विना अडथळा मॅच बघण्यासाठी असा वाढवा WiFi चा स्पीड

इंटरनेट कनेक्शन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग
IPL 2023 Livestream
IPL 2023 Livestreamesakal
Updated on

IPL 2023 Livestream : इंटरनेट कनेक्शन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. आपल्या दैनंदिन जीवनातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या माहितीसाठी आपण त्यावर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असलेला IPL 2023 सामना पाहण्यासाठी आपल्याला हाय स्पीड इंटरनेटची आवश्यकता असते.

IPL 2023 Livestream
Technology Tips : सेल्फ ड्राईव्ह कारमध्ये बसलेले बिल गेट्स म्हणाले हा तर कॉम्प्युटर गेम

अनेक वेळा आपल्याला आवश्यक तेवढा इंटरनेट स्पीड सगळीकडे मिळत नाही. त्यामुळे सामना पाहण्याची मजाच निघून जाते. पण जर तुम्हाला आयपीएल सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहायचा असेल, तर या स्टेप्सच्या मदतीने तुमचा इंटरनेट स्पीड वाढवा.

IPL 2023 Livestream
Technology Tips : फक्त 2999 रुपये भरून घ्या Samsung Galaxy M53, फोनमध्ये मिळेल 108MP कॅमेरा

स्मार्टफोन/डिव्हाइस रीस्टार्ट करा

तुम्हाला तुमच्या वायफायचा स्पीड वाढवायचा असेल तर तुम्ही तुमचा फोन काही काळ बंद करून पुन्हा चालू करू शकता. त्यामुळे तुमच्या वायफायच्या स्पीडची समस्या दूर होईल. याशिवाय तुमचा वायफाय राउटर पुन्हा चालू आणि बंद करा.

IPL 2023 Livestream
Technology Tips : एअरटेलच्या या प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड डेटा शिवाय Disney Plus Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन

वायफाय \ राउटर रीस्टार्ट करा

तुमचा फोन रीस्टार्ट केल्यानेही जर तुमचा प्रोब्लेम सुटत नसेल तर तुमचे वायफाय राउटर बंद करा. त्यानंतर ते अनप्लग करा आणि किमान एक किंवा दोन मिनिटे असेच राहू द्या. यानंतर पुन्हा सुरू करा.

IPL 2023 Livestream
Best SUV Cars : जिकडे तिकडे SUV चीच चर्चा; पण तुम्हाला माहितीयेत का बजेटमधल्या टॉप Five कोणत्या?

राउटर जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा

तुमचे डिव्‍हाइस आणि राउटरमध्‍ये काही अडथळे आले तर इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीमध्‍ये अडचणी निर्माण होऊ शकतात. सिग्नल ब्लॉकेज कमी करण्यासाठी, राउटर आणि स्मार्टफोनमधील अंतर शक्य तितके कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा राउटर जास्त उंचीवर ठेवून तुम्ही सिग्नलची चांगली रेंज देखील मिळवू शकता.

IPL 2023 Livestream
Budget Car : 5 लाखापेक्षा कमी किमतीत येतील या दोन कार, मात्र कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट? वाचा

वायफाय नेटवर्क पुन्हा सेव्ह करा

तुमचे पूर्वी सेव्ह केलेले WiFi नेटवर्क डिलीट करून नव्याने सेव्ह करा. यामुळे वाय-फाय सिग्नल वाढविण्यात मदत होऊ शकते. याशिवाय, तुम्ही तुमचा फोन एकदा रीस्टार्ट करून तुमच्या वायफायचा स्पीड ही वाढवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.