जर तुम्ही हार्डकोअर मोबाईल गेमर असाल, तर तुमच्यासाठी पैसे कमावण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. केवळ मोबाईल गेम खेळून तुम्ही तब्बल दहा लाख रुपये कमवू शकता. आयकू (iQOO) या मोबाईल कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे.
आयकू या मोबाईल कंपनीमध्ये चीफ गेमिंग ऑफिसर ही पोस्ट तयार करण्यात आली आहे. मोबाईल गेमर्सना डोळ्यासमोर ठेऊनच ही पोस्ट तयार करण्यात आली आहे. या पदावर निवड झालेल्या गेमरला सहा महिन्यांसाठी दहा लाख रुपये पगार मिळणार आहे.
हार्डकोअर गेमरचा शोध
आयकूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला अशा एखाद्या व्यक्तीची गरज आहे जो हार्डकोअर गेमर असेल. "ज्याचं जेवण, झोप आणि स्वप्नंही गेमच असेल, अशा व्यक्तीची आम्हाला गरज आहे", असं कंपनीने म्हटलं (iQOO Mobile Gaming officer) आहे.
काय असणार काम?
आयकूच्या स्मार्टफोनमध्ये गेम्स खेळणं हे गेमिंग ऑफिसरचं मुख्य काम असणार आहे. गेम खेळण्याचा अनुभव अधिकाधिक चांगला करण्यासाठी मोबाईलमध्ये काय बदल गरजेचे आहेत, याची माहिती हा ऑफिसर कंपनीला देईल. यामध्ये गेमप्ले, गेमिंग स्टाईल, प्रेझेंटेशन आणि गेमिंग इंटरप्रेटेशन्स यांसह इतर गोष्टी पहाव्या लागतील.
या व्यक्तीला केवळ आयकूच्या टीमसोबतच नाही, तर देशभरातील इतर गेमर्स आणि गेमिंग कम्युनिटीशी जोडलं जाण्याची संधी मिळेल, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.
कोण करू शकतं अप्लाय
याठिकाणी अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचं वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावं. ही व्यक्ती भारतात राहणारी असावी. केवळ एवढ्याच अटी कंपनीने दिल्या आहेत. जेन-झीला डोळ्यासमोर ठेऊन ही ऑफर लाँच करण्यात आली आहे. आयकू इंडियाचे सीईओ निपून माऱ्या यांनी याबाबत माहिती दिली
असं करा अप्लाय
यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आयकूच्या वेबसाईटवर (iQOO Mobile Gaming officer apply) जायचं आहे. त्यानंतर या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठीचा फॉर्म भरा. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मोठा अर्ज भरावा लागेल. त्यानंतर गेमिंग राऊंड आणि ऑडिशन झाल्यानंतर तुमची याठिकाणी निवड झाली की नाही हे समजणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ जून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.