Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Iran President Helicopter Crash : 'बेल 212' हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस यांचे 'बेल 212' हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस यांचे 'बेल 212' हेलिकॉप्टर क्रॅश झाले. esakal
Updated on

Iran Helicopter Crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस यांचे हेलिकॉप्टर काल क्रॅश झाले. त्यानंतर या हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ते ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते ते 'बेल 212' हेलिकॉप्टर असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन कंपनी बेल टेक्स्ट्रॉन इंकने 1960 मध्ये हेलिकॉप्टर बनवले होते.

लष्करी विश्लेषक सेड्रिक लीटन यांनी सांगितले की इराणचे अध्यक्ष इब्राहिम बहुधा बेल 212 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, ज्याने 1960 या हेलिकॉप्टरची निर्मिती झाली होती. त्याचवेळी अध्यक्ष इब्राहिम रईस 15 आसनी बेल 212 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचा दावा अल जझीराने केला आहे. बेल 212 हे एक मध्यम आकाराचे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर आहे.

हे हेलिकॉप्टर नागरी, व्यावसायिक आणि लष्करी कामांसाठी वापरले जाते. हे एक मध्यम आकाराचे हेलिकॉप्टर आहे आणि त्यात एक पायलट आणि 14 लोक बसू शकतात.या हेलिकॉप्टरमध्ये फक्त 2 ब्लेड आहेत. म्हणून त्याला टू ब्लेड हेलिकॉप्टर असेही म्हणतात.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस यांचे 'बेल 212' हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
Iran-Israel War : इस्राईल-इराण युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम दीर्घकाळाचा की..?

बेल 212 मध्ये नेमकी त्रुटी काय आहे?

बेल 212 हेलिकॉप्टर हे बेल 205 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. बेल 212 हेलिकॉप्टर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली होते. सामर्थ्य आणि विश्वासार्हतेचे दावे असूनही, बेल 212 हेलिकॉप्टर दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत अनेक अपघातांना कारणीभूत ठरले आहे. 1997 मध्ये देखील लुईझियानाच्या किनाऱ्यावर बेल 212 हेलिकॉप्टर कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला होता.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस यांचे 'बेल 212' हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
Military Helicopters Crash: मलेशियामध्ये 2 लष्करी हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, 10 जणांचा मृत्यू, Video Viral

हे हेलिकॉप्टर खूप जुने असल्याने त्याचे सुटे भाग मिळण्यात अडचणी येत होत्या. यूएस एअरफोर्सचे निवृत्त कर्नल लेइटन म्हणाले की, हेलिकॉप्टर प्रथम युनायटेड स्टेट्स आणि नंतर कॅनडामध्ये तयार केले गेले. 1976 मध्ये शाह यांच्या कारकिर्दीत ते प्रथम व्यावसायिकरित्या वापरले गेले. त्यामुळे इराणींना स्पेअर पार्ट्स मिळवण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागला असावा. त्याचबरोबर खराब हवामान हे देखील या अपघाताचे कारण असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.