Tatkal Ticket Booking साठी हा पर्याय आहे बेस्टम बेस्ट

IRCTC Master List : तात्काळ तिकीट ऑनलाईन कसे बुक करायचे पहा
IRCTC Master List
IRCTC Master List esakal
Updated on

 IRCTC Master List : तुम्ही बाहेर गावी जाताना वेळ न मिळाल्याने रेल्वेचे तिकीट बुक करायला विसरता. तेव्हा घाई घाईत जाऊन तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करता. पण तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे रिझर्व्हशन कन्फर्म होत नाही.

त्यावेळी नाईलाजाने Tatkal Ticket Option ची निवड करावी लागते. हे तिकीट ऑनलाईन देखील बुक करता येते. ते कसे करायचे याबद्दल आज जाणून घेऊयात.

IRCTC Master List
IRCTC Ticket booking : आता नुसता तोंडी हुकूम दिला की बुक होणार ट्रेन तिकीट, IRCTCची नवी सेवा

AC तात्काळ तिकिट बुकिंगची सेवा सकाळी १० वाजेपासून सुरू होते. तर स्लिपर क्लाससाठी सकाळी 11 वाजेपासून सेवा सुरू होते. बुकिंग करण्याआधी तुम्ही आधीच लॉगिन केल्यास तुम्हाला याचा फायदा होतो.

त्यामुळे AC Tatkal Ticket Booking साठी तुम्हाला 9.58 वाजेपासून लॉग इन करावे लागेल. तर स्लिपर क्लाससाठी तुम्हाला 10.58 ला लॉग इन करावे लागेल. या ठिकाणी गेल्यानंतर माय प्रोफाइल MyProfile मध्ये जावून आधीच मास्टर लिस्ट तयार करावी लागणार आहे.

IRCTC Master List
Train Ticket : ट्रेन चुकली आता तिकीटाचं काय करायचं? Don't Worry, त्याच तिकीटावर करा प्रवास!

- IRCTC वर तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम IRCTC अकाऊंट तयार करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. तुम्ही https://www.irctc.co.in वेबसाइट किंवा IRCTC अॅपला भेट देऊ शकता.

- अकाऊंट तयार झाल्यानंतर, एक मास्टर लिस्ट तयार करावी लागेल. माय प्रोफाईल विभागात तुम्ही मास्टर लिस्ट बनवू शकता.

- येथे तुम्हाला Add/Modify Master List वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नॉर्मल, दिव्यांग, पत्रकार यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला पॅसेंजरचे नाव, वय टाकावे लागेल.

- लिंग, जन्म प्राधान्य, अन्न प्राधान्य, ज्येष्ठ नागरिक, ओळखपत्राचा प्रकार आणि ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला मास्टर लिस्टमध्ये प्रवासी जोडावे लागेल. तुम्ही लिस्टमध्ये 20 प्रवासी जोडू शकता. फक्त तुमची मास्टर लिस्ट तयार होईल.

IRCTC Master List
Train Accidnet: धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन तो रेल्वे...

कसे वापराल हे

जेव्हा तुम्ही मास्टर लिस्ट वापरण्यासाठी IRCTC द्वारे तिकीट बुक कराल. तेव्हा प्रवासी तपशील पृष्ठावर My Saved Passenger(s) List चा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करावे लागेल.

यानंतर, तुम्हाला प्रवासी लिस्टतून ज्यांना निवडायचे आहे ते निवडा. असे केल्याने तुम्हाला प्रवाशांचे तपशील वेगळे टाकावे लागणार नाहीत. सर्व प्रवासी एकाच वेळी जोडले जातील. यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तत्काळ तिकीट लवकर होईल.

IRCTC Master List
Chin War Training : युद्धनौका, लढाऊ विमाने आदींच्या सरावाने चीनकडून तैवानची कोंडी

मास्टर लिस्टचा थेट उद्देश हाच असतो की, Tatkal Ticket Booking Start झाल्यानंतर तुम्हाला नंतर पुन्हा प्रयत्न करावे लागत नाहीत. मास्टर लिस्ट बनवल्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल लिस्ट तयार करायला हवी. बुकिंग सुरू झाल्यानंतर विना कोणतेही डिटेल टाका, थेट मास्टर लिस्टची निवड करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.