IRCTC Ticket Reservation : रेल्वेचे अ‍ॅडवांस बुकिंग होणार फक्त 60 दिवस आधी,कोणत्या प्रवाशांवर होणार परिणाम? जाणून घ्या

IRCTC Changes Advance Booking Period to 60 Days : भारतीय रेल्वेने 1 नोव्हेंबर 2024 तिकीट बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
IRCTC Changes Advance Booking Period to 60 Days
Indian Railways Updates Advance Booking Limit Reduced to 60 Daysesakal
Updated on

Indian Railways Ticket Booking : भारतीय रेल्वेने 1 नोव्हेंबर 2024 तिकीट बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. IRCTC अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याच्या कालावधीत बदल करण्यात आला असून, आता हे बुकिंग 120 दिवसांच्या ऐवजी केवळ 60 दिवस आधीच करता येणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना सोयीस्कर व नियमित तिकिटे उपलब्ध करून देण्यासाठी आणि वेटिंग लिस्ट व्यवस्थापनासाठी हा बदल केला आहे. यांची घोषणा गेल्या महिन्यात झाली होती आणि आता या महिन्यापासून हे नियम लागू झालेले आहेत.

कोणत्या प्रवाशांवर होणार परिणाम?

नवीन बुकिंग नियम फक्त IRCTC च्या प्लॅटफॉर्मपुरतेच मर्यादित नसून इतर बुकिंग साइट्स आणि अ‍ॅप्सवरही लागू असणार आहेत. Ixigo, Paytm, MakeMyTrip यांसारख्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करणारे प्रवासी आणि थेट रेल्वे काउंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्यांनाही याचा परिणाम होणार आहे. विशेषतः सणांच्या काळात, वेटिंग लिस्ट मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक प्रवाशांना बुकिंग करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळेच रेल्वेने आगाऊ बुकिंग कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IRCTC Changes Advance Booking Period to 60 Days
Traffic Fine On Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपवरून मिनिटांत भरता येणार वाहतूक दंड, नेमकं कसं? पाहा एका क्लिकमध्ये..

टिकिट बुकिंगचे बदललेले नियम

आता प्रवासी त्याच्या प्रवासाच्या तारखेच्या 60 दिवस आधीच आगाऊ तिकीट बुक करू शकणार आहेत, जे पूर्वी 120 दिवसांपूर्वी करता येत होते. मात्र Tatkal तिकीट बुकिंगचे नियम बदललेले नाहीत. Tatkal तिकिटे आता AC क्लाससाठी सकाळी 10 वाजता आणि Non-AC क्लाससाठी 11 वाजता बुक करता येतील.

सणासुदीच्या काळात किंवा जास्त दिवसाच्या वीकेंडला प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना आता आगाऊ तिकीट बुकिंग कालावधी कमी झाल्यामुळे वेळेत बुकिंग करणे आवश्यक असेल.

IRCTC Changes Advance Booking Period to 60 Days
BSNL VIP Number: एकदम भारी! BSNLचा फॅन्सी मोबाईल नंबर निवडा, ते ही अगदी फ्री, कशी करायची ऑनलाईन प्रोसेस? वाचा एका क्लिकवर

IRCTC प्लॅटफॉर्म सुधारणा आणि सुरक्षितता उपाय

IRCTC ने आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक सुधारणा केल्या आहेत. विशेषतः प्रवासी सकाळी 8 वाजण्यापूर्वी लॉगिन केले असल्यास 8 वाजता ते लॉगआउट होतील आणि तिकिट बुक करण्यासाठी परत लॉगिन करावे लागेल. Tatkal बुकिंगसाठीही AC वर्गासाठी सकाळी 10 आणि Non-AC वर्गासाठी सकाळी 11 वाजता लॉगिन करणे आवश्यक आहे. याशिवाय एका लॉगिन सत्रात फक्त एक PNR क्रमांक तयार करता येईल, त्यानंतर पुढील बुकिंगसाठी नवीन लॉगिन आवश्यक असेल.

रेल्वेने काळाबाजार थांबवण्यासाठी हा बदल केला असून, प्रवाशांना सोयीस्कर आणि योग्य पद्धतीने तिकीट बुक करता येईल अशी व्यवस्था केली आहे. IRCTC प्लॅटफॉर्मवरील बुकिंग अनुभव सुधारून प्रवाशांना याचा अधिक लाभ होईल, असे भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()