IRCTC Ticket Reservation : रेल्वेने तिकीट बुकिंगची वेळमर्यादा ६० दिवसांनी केली कमी, काय आहेत नवे नियम? प्रवाशांचे टेन्शन वाढले
Indian Railway Ticket Booking New Rules : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना आता गाडी सुटण्याच्या केवळ 60 दिवस आधीच तिकीट आरक्षण करता येणार आहे. सध्या हा कालावधी 120 दिवसांचा होता, परंतु 1 नोव्हेंबर 2024 पासून हा नियम लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ होईल, तर तिकीट रद्द होण्याच्या समस्या देखील कमी होतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे; परंतु प्रवाशांसाठी हा निर्णय किती योग्य ठरेल हे पाहण्यासारखे आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, तिकीट आरक्षणासाठी कमी कालावधी ठरवल्यामुळे तात्काळ प्रवासाचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच, गाडी रद्द झाल्यास प्रवाशांना नको त्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. यासोबतच रेल्वेच्या आरक्षण यंत्रणेत बदल करून प्रवाशांच्या मागण्या ओळखून त्यानुसार तिकीट वितरणात सुधारणा केली जाईल. (train ticket booking marathi news)
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भारतीय रेल्वेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत तिकीट आरक्षणानंतर त्वरित सीट उपलब्धता तपासण्यासाठी AI मॉडेल तयार करण्यात आले आहे.
यामुळे प्रवाशांना प्रतीक्षा यादीतून लवकर तिकीट मिळण्यास मदत होईल आणि 30% अधिक प्रवाशांना निश्चित तिकीट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. (train ticket booking) रेल्वेच्या स्वयंपाकगृहांमध्ये देखील AI तंत्रज्ञान वापरले जात आहे, ज्यामुळे स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवली जात आहे. पुण्यातील पायलट प्रोजेक्टद्वारे धुतलेल्या चादरींची 100% पडताळणी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे समाधानही वाढले आहे.
विदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांच्या आरक्षण कालावधीमध्ये कोणताही बदल होणार नाही. (railway ticket booking) तसेच, काही विशेष गाड्यांसाठी जसे की ताज एक्सप्रेस, गोमती एक्सप्रेस, इत्यादीसाठी आधीपासून कमी कालावधीचा नियम लागू असलेल्या गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.