IRCTC Vikalp Yojana : दिवाळीत घरी जायचंय पण रेल्वेचं बूकिंग फुल आहे? चिंता कशाला; 'या' योजनेतून मिळवा कन्फर्म तिकीट, पाहा सोपी प्रोसेस

Confirm Train Ticket Tips IRCTC Opt Vikalp Yojana : भारतीय रेल्वेने IRCTC द्वारे ‘विकल्प’ योजना सुरू केली आहे, ज्यामुळे वेटलिस्ट तिकिट असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Diwali Train Ticket Booking Confirm Ticket
IRCTC Opt Vikalp Yojana Train Ticket Bookingesakal
Updated on

Confirm Ticket Vikalp Scheme : सणासुदीच्या काळात गावी जाण्याच्या प्रवासाची लगबग वाढली आहे. त्यातच दिवाळीच्या काळात रेल्वे तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने कन्फर्म तिकीट मिळवणे अनेकांसाठी आव्हान ठरले आहे. प्रवाशांच्या या समस्येवर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने IRCTC द्वारे ‘विकल्प’ योजना सुरू केली आहे, ज्यामुळे वेटलिस्ट तिकिट असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

विकल्प योजना म्हणजे काय?

IRCTC ची विकल्प योजना ही अशा प्रवाशांसाठी एक पर्यायी सेवा आहे ज्यांचे तिकीट वेटलिस्टवर आहे. या योजनेतून, प्रवाशांना त्यांच्या मूळ ट्रेनच्या बदल्यात दुसऱ्या उपलब्ध ट्रेनमध्ये स्थानांतरित करून कन्फर्म सीटची संधी मिळते. तथापि, विकल्प योजनेत सहभागी झाल्याने कन्फर्म सीटची हमी नसते, पण सीट मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते.

Diwali Train Ticket Booking Confirm Ticket
Pan Card Update : पॅनकार्डवरील माहिती बदलायची आहे? चिंता कशाला, घरबसल्या मोबाईलवरुन करा अपडेट; सोप्या स्टेप्स वाचा एका क्लिकमध्ये..

विकल्प योजना कशी कार्य करते?

जर प्रवाशांनी विकल्प योजना निवडली, तर त्यांचे वेटलिस्ट तिकीट दुसऱ्या ट्रेनमध्ये बदलले जाऊ शकते, जी मूळ वेळेच्या १२ तासांच्या आत असते. या योजनेत सहभागी झाल्यास, त्यांच्या मार्गावर सीट उपलब्ध असल्यास, त्यांचे तिकीट आपोआप कन्फर्म होईल. मात्र, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास साधारण रद्दीकरण शुल्क लागू होईल.

विकल्प योजनेचे मुख्य फायदे

कन्फर्मेशनची शक्यता वाढते.वेटलिस्ट प्रवाशांना पर्यायी ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता असते.अतिरिक्त शुल्क नाही.विकल्प योजना निवडल्यास प्रवाशांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत.या योजनेमुळे प्रवाशांना सीट उपलब्धतेनुसार सहजपणे पर्यायी ट्रेनमध्ये स्थानांतर करता येते, ज्यामुळे पुन्हा तिकीट बुकिंगचा त्रास कमी होतो.

Diwali Train Ticket Booking Confirm Ticket
Oppo a3x Launch : हे काय नवीन! मार्केटमध्ये आला आयफोनसारखा Oppo a3x,कमाल फीचर्स अन् किंमत चक्क १० हजारपेक्षा कमी

विकल्प योजना कशी निवडावी?

  • IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपवर लॉगिन करा.

  • प्रवासाची तारीख, स्त्रोत, गंतव्य आणि प्रवासाचा वर्ग निवडा.

  • प्रवासी तपशील भरा आणि तिकीट बुक करा.

  • विकल्प योजनेचा पर्याय निवडा.

  • उपलब्ध पर्यायी ट्रेनची यादी तपासा. या दिवाळीत प्रवासासाठी 'विकल्प' योजना निवडून तिकीट बुकिंग करा आणि प्रवासाचा आनंद घ्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.