तुमचे Aadhaar Card सुरक्षित आहे का? पाच मिनिटांत जाणून घ्या

आपले आधार कार्ड सुरक्षित आहे का? जाणून घ्या
adhar card
adhar cardsakal
Updated on

कोणत्याही महत्त्वाच्या व्यवहारांसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आधारकार्ड हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. पण आपले आधार कार्ड सुरक्षित आहे का? कारण जसा आधार कार्डचा वापर वाढला, तेवढाच आधार कार्डच्या सुरक्षितेला धोका वाढला. यासंदर्भआत आधारकार्ड जारी करणार्‍या यूनिक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)कडून नागरिकांना वेळोवेळी सतर्क करण्यात येते.

adhar card
चंद्र शोषतोय पृथ्वीवरील पाणी - शास्त्रज्ञांचा अभ्यास

तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आधारशी लिंक आहे की नाही याबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile या वेबसाइटचा वापर करू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile या वेबसाइटला भेट द्या.

  • 'Verify Mobile Number' आणि 'Verify Email Address' असे दोन पर्याय दिसेल. त्यातुन एक पर्याय निवडा.

  • तुमचा आधार क्रमांक टाका.

  • तुमचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल टाका.

  • कॅप्चा योग्यरित्या भरा आणि 'ओटीपी पाठवा' पर्याय निवडा.

  • OTP योग्य ईमेल पत्त्यावर किंवा मोबाईल नंबरवर पाठवला असल्यास, ते दर्शवते की तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेली माहिती बरोबर आहे आणि तुमचा फोन नंबर किंवा ईमेल पत्ता त्याच्याशी जोडलेला आहे.

adhar card
AC खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 5 गोष्टी, नाहीतर...

आधार कार्डचे विविध प्रकार असतात ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. हे प्रकार कोणते ते जाणून घेऊया.…

आधार लेटर : UIDAIतर्फे आधार कार्ड दिले जाते. त्यावर क्यू आर कोड आणि कार्ड तयार केलेल्या दिवसाची तारीख लिहिलेली असते. नवीन नोंदणी किंवा बायोमेट्रीक अपडेट केल्यावर हे कार्ड नागरिकांना सर्वसाधारण टपाल व्यवस्थेद्वारे घरी पाठवले जाते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आधार कार्ड हरवल्यास UIDAIच्या संकेतस्थळावरून त्याची पुनर्छपाई करता येते. असे कार्ड स्पीड पोस्टद्वारे पाठवले जाते.

ई - आधार : ही आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आहे. ही आवृत्ती UIDAIद्वारे डिजिटली साक्षांकित केली जाते. यात कार्ड तयार करण्यात आल्याची तारीख, ऑफलाइन व्हेरिफिकेशनसाठी सुरक्षित कोड असतो. यासाठी सांकेतांकाची गरज असते. UIDAIच्या संकेतस्थळावरून ई-आधार आणि मास्क्ड ई-आधार डाऊनलोड करता येते. मास्क्ड ई-आधारमध्ये केवळ शेवटचे चार अंकच दिसतात.

adhar card
Honda Cars India:स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी; ही कंपनी देत आहे बंपर डिस्काउंट

आधार पीव्हीसी कार्ड : आधार कार्डप्रमाणेच दिसणारे पीव्हीसी कार्ड असते. यात डिजिटली साक्षांकित क्यूआर कोड असतो. यात छायाचित्रासह डेमोग्राफीक माहिती असते. UIDAIच्या संकेतस्थळावरून ५० रुपये भरून हे कार्ड ऑनलाइन ऑर्डर करता येते.

एम आधार : UIDAIने एक मोबाईल ॲप विकसित केले आहे. हे ॲप smartphoneमध्ये इन्स्टॉल करता येते. हे ॲप google store किंवा IOS मधून इन्स्टॉल करता येते. याद्वारे कार्डधारकांना नोंदणीकृत आधार तपशीलासाठी इंटरफेस मिळतो. यात डेमोग्राफीक माहितीसह, छायाचित्र आणि आधार क्रमांक असतो. यात ऑफलाइन व्हेरीफिकेशनसाठी सुरक्षित कोडही असतो. एम आधार मोफत डाऊनलोड करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.