Chandrayaan-3 Launch : पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान-३, चंद्राकडे प्रवास सुरू!

चांद्रयान-३ मोहिमेबाबतचे सर्व लाईव्ह अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर..
Chandrayaan-3 Launch
Chandrayaan-3 LauncheSakal
Updated on

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेलं चांद्रयान-३ अवकाशात झेपावलं आहे. आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन हे चांद्रयान लाँच करण्यात आलं. लाँचनंतर काही मिनिटांमध्ये हे चांद्रयान पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत पोहोचलं.

पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान मोहिमेच्या यशस्वी सुरुवातीबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं. आपल्या शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीचं हे यश असल्याचं ते म्हणाले.

४० दिवस काम सुरू

आज लाँच झाल्यानंतर आता पुढील ४० दिवस इस्रोचे वैज्ञानिक सतत कार्यरत राहतील. या दरम्यान या यानावर सातत्याने लक्ष ठेवावे लागणार. सध्या हे चांद्रयान अगदी सुरळीतपणे काम करत असल्याची माहिती इस्रोने दिली.

पुढील टप्पे

यानंतर आता हे चांद्रयान पृथ्वीभोवती काही वेळा फिरेल. त्यानंतर पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे, लँडर यानापासून वेगळं करणे, डीबूस्ट करण्यासाठी चंद्राच्या फेऱ्या मारणे, सॉफ्ट लँडिंग करणे असे बरेच टप्पे बाकी असल्याची माहिती प्रोजेक्ट डिरेक्टर पी. वीरामुथुवेल यांनी दिली.

इस्रो प्रमुखांनी व्यक्त केला आनंद

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ आणि चांद्रयान-३ चे प्रोजेक्ट डिरेक्टर पी. वीरामुथुवेल यांनी यावेळी आपला आनंंद व्यक्त केला. सोमनाथ यांनी आपल्या संपूर्ण टीमचे आभार मानले. यासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटने आपल्याला आजिबात निराश केलं नाही, असंं मत यावेळी वीरामुथुवेल यांनी व्यक्त केलं.

चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू

पृथ्वीच्या अपेक्षित कक्षेमध्ये पोहोचल्यानंतर आता चांद्रयान-३ ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. या यानातील सर्व पॅरामीटर्स स्थिर असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

इस्रोच्या शास्त्रज्ञांचा जल्लोष

चांद्रयान-३ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जल्लोष केला आहे. यामुळे फॅट बॉय हे रॉकेट अगदी विश्वासार्ह असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं.

पृथ्वीच्या कक्षेत पोहोचलं चांंद्रयान-३

पृथ्वीच्या बाहेरील कक्षेमध्ये चांद्रयान-३ सुरक्षितपणे पोहोचलं आहे. यामुळे या मोहिमेतील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्याचं इस्रोच्या प्रमुखांनी स्पष्ट केलं.

पहिल्या दोन स्टेज यशस्वी

लाँचनंतरचे पहिल्या दोन स्टेजेस यशस्वीपणे पार पडले आहेत. या टप्प्यांमध्ये S200 बूस्टर सेप्रेट करणे, आणि पेलोड फायरिंग सेप्रेट करणे यांचा समावेश होता. यानंतर आता क्रायोजेनिक (CE25 Stage) इंजिन सुरू करण्यात आलं आहे.

ऐतिहासिक क्षण!

चांद्रयान-३ अखेर अवकाशात झेपावलं आहे. पुढील १६ मिनिटांमध्ये ते पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत पोहोचेल.

लाईव्ह टेलिकास्ट सुरू

इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि वेबसाईटवरुन या प्रक्षेपणाचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू करण्यात आलं आहे. यासोबतच, दूरदर्शनवर देखील तुम्ही या लाँचचं थेट प्रक्षेपण पाहू शकता.

३० मिनिटं बाकी

चांद्रयान-३ च्या लाँचसाठी अवघी ३० मिनिटं बाकी आहेत. २ वाजून ३५ मिनिटांनी हे चांद्रयान अवकाशात लाँच होणार आहे.

चंद्रावर कधी पोहोचणार?

आज लाँच झाल्यानंतर चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान-३ ला सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागेल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ किंवा २४ ऑगस्ट या दिवशी चांद्रयान चंद्रावर उतरेल. काही अडचणी आल्यास, या तारखा बदलूही शकतात असं इस्रोने स्पष्ट केलं.

राजनाथ सिंह यांच्या शुभेच्छा

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील इस्रोच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण हे नवभारताच्या आकांक्षांना नवे आकाश देईल, असं ते म्हणाले.

सॉफ्ट लँडिंगचं लक्ष्य

चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान विक्रम लँडर क्रॅश झाले होते. त्यामुळे, या मोहिमेत हे लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे हे सर्वात महत्त्वाचं लक्ष्य असणार आहे. चांद्रयान-३ मधील लँडरला विक्रम, आणि रोव्हरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे.

वाळूशिल्पाच्या माध्यमातून शुभेच्छा

भारतातील प्रसिद्ध वाळूशिप्लकार सुदर्शन पटनाईक यांनी देखील इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. चांद्रयान-३ साठी विशेष शिल्प तयार करुन त्यांनी 'विजयी भवं!' असा संदेश दिला आहे.

पंतप्रधानांच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून चांद्रयान-३ मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. '१४ जुलै २०२३ हा दिवस भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या बाबतीत सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. चांद्रयान-३ ही आपली तिसरी चंद्रमोहीम, आपल्या प्रवासाला आज सुरुवात करेल. आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्ने घेऊन हे चांद्रयान अवकाशात झेप घेईल.' अशा आशयाचं ट्विट मोदींनी केलं आहे.

लिक्विड इंजिनमध्ये इंधन भरले

चांद्रयानसाठी वापरण्यात येणाऱ्या एलएमव्ही रॉकेटच्या लिक्विड इंजिनमध्ये (L110 stage) इंधन भरून पूर्ण झाल्याची माहिती इस्रोने दिली. यानंतर क्रायोजेनिक इंजिनमध्ये (C25 stage) इंधन भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भारत रचणार इतिहास

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे. तर, चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा भारत पहिलाच देश असणार आहे.

मोहिमेचं उद्दिष्ट

या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न भारत करेल. यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाचं सखोल परीक्षण करून, तेथील मातीतील मिनरल्स आणि इतर तत्वांची चाचणी करणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.