Chandrayaan 3 : भारताचं यश पाहून चीनला पोटदुखी; म्हणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलंच नाही 'चांद्रयान-3'

China Top Scientist : चीनच्या चांद्र मोहिमांचे जनक म्हणवल्या जाणाऱ्या ओऊयांग झियुआन या वैज्ञानिकाने हा दावा केला आहे.
Chandrayaan 3 ISRO
Chandrayaan 3 ISROeSakal
Updated on

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताने इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. मात्र, भारताचं हे यश चीनला मान्यच नाहीये.

चीनच्या एका प्रतिष्ठित अवकाश संशोधकाने असा दावा केला आहे, की भारताचं चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलंच नाही. चीनच्या चांद्र मोहिमांचे जनक म्हणवल्या जाणाऱ्या ओऊयांग झियुआन या वैज्ञानिकाने हा दावा केला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Chandrayaan 3 ISRO
Shukrayaan Mission : शुक्र मोहीमेच्या तयारीला वेग, पेलोड डिव्हाईसेस तयार! इस्रो प्रमुखांची माहिती

सायन्स टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत झियुआन म्हणाले, की "चांद्रयान-3 जिथं उतरलं ती जागा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ नव्हती, किंबहुना ती ध्रुवीय भागात देखील नव्हती. लँडर आणि रोव्हर जिथे उतरले ती जागा 69 डिग्री साऊध आहे. ही जागा चंद्राच्या ध्रुवीय भागात येत नाही. कारण ध्रुवीय भाग हा 88.5 ते 90 डिग्री या जागेत येतो."

काय आहे तर्क?

झियुआन म्हणतात, की आपली पृथ्वी ही 23.5 अंश कोनामध्ये तिरकी झालेली आहे. त्यामुळे पृथ्वीचा ध्रुवीय भाग हा 66.5 ते 90 अंश कोनामध्ये गणला जाऊ शकतो. मात्र चंद्र हा केवळ 1.5 अंश कोनामध्ये तिरका आहे. त्यामुळे चंद्राचा ध्रुवीय भाग हा पृथ्वीच्या तुलनेत अगदीच लहान आहे. त्यामुळे चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं म्हणणं चुकीचं आहे.

Lunar South Pole Region
Lunar South Pole RegioneSakal

नासाचं काय म्हणणं?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागाबाबत नासाची वेगळी व्याख्या आहे. या व्याख्येनुसार चांद्रयान-3 हे नक्कीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड झालं आहे असं म्हणता येईल. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनीही चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगनंतर शुभेच्छा देताना "दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केल्याबद्दल अभिनंदन" अशा आशयाची एक्स पोस्ट केली होती.

व्याख्या कोणतीही असली, तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सर्वात जवळ लँडिंग केल्याचा विक्रम इस्रोच्याच नावे आहे. शिवाय चांद्रयान-1 ते चांद्रयान-3 या तिन्ही मोहिमांमधून भारताने चंद्राची अमूल्य माहिती गोळा केली आहे. त्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये भारताचं यश हे निर्विवाद आहे.

Chandrayaan 3 ISRO
Chandrayaan-3: चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले नाहीत तर काय? इस्त्रोने काय म्हटलं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.