Chandrayaan 3 Update : पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे, दोन भागांमध्ये विभागलं जाणार चांद्रयान-३!

ISRO Moon Mission : आता चांद्रयान-3 चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेत म्हणजेच 153 किमी x 163 किमी अंतरावर आहे.
Chandrayaan 3 ISRO Moon Mission
Chandrayaan 3 ISRO Moon MissioneSakal
Updated on

Chandrayaa-3 : 14 जुलै रोजी प्रक्षेपित झालेलं चांद्रयान-3 आता चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघे काही किलोमीटर दूर आहे. चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेत पोहोचल्यानंतर आता चांद्रयान-3 दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागले जाणार आहे. येत्या काही तासांमध्ये प्रॉपल्शन मॉड्यूल विक्रम लँडरपासून वेगळे होईल. तिथून पुढे दोघेही पुढचा प्रवास स्वतंत्रपणे करतील.

इस्रोने बुधवारी सकाळी चांद्रयान-3 चंद्राच्या शेवटच्या कक्षेत इंजेक्ट केलं आहे. आता चांद्रयान-3 चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेत म्हणजेच 153 किमी x 163 किमी अंतरावर आहे. येथून चांद्रयानाच्या लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. त्यातील पहिला टप्पा हा प्रॉपल्शन मॉड्यूल वेगळे करणे असेल. यानंतर, चांद्रयानाचा वेग आणि दिशा बदलली जाईल आणि हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आणण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Chandrayaan 3 ISRO Moon Mission
Luna 25 : चंद्राच्या कक्षेत पोहोचलं रशियाचं 'लूना-25'; दक्षिण ध्रुवाजवळ 21 ऑगस्टला होणार लँड

पुढील प्रक्रिया काय?

चांद्रयान-3 हे तीन प्रमुख भागांनी बनलेले आहे, पहिला भाग प्रॉपल्शन मॉड्यूल, दुसरा लँडर विक्रम आणि तिसरा प्रज्ञान रोव्हर आहे. सध्या हे तीन भाग चंद्राच्या कक्षेत एकत्र आहेत. आज (17 ऑगस्ट) प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होतील.

यानंतर, प्रॉपल्शन मॉड्यूल चंद्राच्या अंतिम कक्षेत फिरत राहील, तर चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडरचे अंतर कमी होईल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरचे पहिले डी-ऑर्बिटिंग 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. म्हणजेच प्रथमच त्याचे चंद्रापासूनचे अंतर कमी होणार आहे. यानंतर, 20 ऑगस्ट रोजी पुन्हा सव्वा दोन वाजता डी-ऑर्बिट केले जाईल. 23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.

Chandrayaan 3 ISRO Moon Mission
ISRO Moon Mission : चांद्रयान-२ पासून धडा घेत केल्या चांद्रयान-३ मध्ये सुधारणा; 'या' गोष्टींमुळे यशस्वी होणार यंदाची मोहीम

चांद्रयान-3 समोरील आव्हाने

विक्रम लँडरपासून वेगळे झाल्यानंतर चांद्रयान-3 चे प्रॉपल्शन मॉड्यूलमधून वेगळे केले जाईल. हे महत्त्वाचे आहे, कारण चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवायचे आहे, याठिकाणी मोठे खड्डे, खडक आहेत. त्यामुळे सपाट लँडिंग साइट शोधणे हे चांद्रयान-3 साठी मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय त्याची दिशाही ठरवली जाईल. आतापर्यंत चांद्रयान-3 चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. सॉफ्ट लँडिंगसाठी प्रोपल्शन मॉड्यूलपासून विभक्त झाल्यानंतर विक्रम लँडरला अनुलंब केले जाईल.

कोणत्या भागाचं कार्य काय?

प्रॉपल्शन मॉड्यूल : पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यापासून, विक्रम लँडरला चंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी प्रॉपल्शन मॉड्यूलने पार पाडली आहे. लँडरपासून वेगळे झाल्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत फिरेल आणि रोव्हरद्वारे गोळा केलेली माहिती पृथ्वीवर पाठवेल.

लँडर मॉड्यूल : चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलचे नाव विक्रम आहे, प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर, ते रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर नेण्यासाठी जबाबदार असेल.

रोव्हर : रोव्हर प्रज्ञान सध्या विक्रम लँडरच्या आत आहे, चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर ते लँडरपासून वेगळे होईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर जाईल. येथून रोव्हर जी माहिती गोळा करेल ती प्रॉपल्शन मॉड्यूलला पाठवली जाईल आणि तेथून ती इस्रोपर्यंत पोहोचेल.

Chandrayaan 3 ISRO Moon Mission
ISRO Aditya L1 : चंद्र टप्प्यात, अन् सूर्याकडे झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज! श्रीहरीकोटामध्ये पोहोचला 'आदित्य एल-1' उपग्रह

इस्रोचं मिशन पूर्ण होणार

चांद्रयान-2 जेव्हा लँडिंग साइटपासून 400 मीटर दूर होते, तेव्हा त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला आणि क्रॅश लँडिंग झाले. यावेळी असे काहीही होणार नाही, असा दावा इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी केला आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की त्याचे सॉफ्टवेअर खराब झाल्यास, सेन्सर बिघडले किंवा कॅमेरा बिघडला तर ते लँडिंगपूर्वी स्वतःची दुरुस्ती स्वतःच करेल. कोणत्याही सेन्सरने नीट काम केले नाही, तरी ते नक्कीच सॉफ्ट लँडिंग करेल, असं सोमनाथ म्हणाले.

इस्रो चांद्रयान-3 वर लक्ष ठेवून

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून चांद्रयान-3 वर प्रत्येक क्षणी नजर ठेवली जात आहे. इस्रोचे बंगळुरू स्थित सेंटर टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क यावर सतत लक्ष ठेवून असते. सध्या ते उत्तम प्रकारे काम करत आहे आणि मिशनच्या रचनेनुसार प्रगती करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()