ISRO Free Education : विद्यार्थ्यांना आता इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून घेता येणार मोफत शिक्षण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने होतकरु शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणार आहे.
ISRO Free Education
ISRO Free Educationesakal
Updated on

ISRO Free Education : भारतीय अंतराळ संशोधन संस्थे कडून (ISRO) होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इयत्ता ८ वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेंसिंग आणइ जिओ इंफोर्मेशन सायंस शिकण्याची इच्छा असेल आणि विज्ञान गणिताची मुलभूत माहिती असेल असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. इस्रोच्या स्पेस क्युरिऑसिटी उपक्रमाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम दिला जातो.

त्याचप्रमाणे NCERT च्या अभ्यासक्रमानुसार रिमोर सेंसिंग तंत्रज्ञामाच्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. इस्रोच्या विविध केंद्रातील शास्रज्ञ आणि प्रध्यापक हे वर्ग घेणार आहेत.

शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेंसिग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना सहज अवगत होईल अशी सोपी भाषा चित्र आणि अॅनिमेशनचा वापर या अभ्यासक्रमात केला जाणार आहे यात रिमोट सेंसिग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (EMR) जिओ स्टेशनरी आणि सुर्य-समकालिका उपग्रह रिमोट सेंसरचे प्रकार आणि मल्टिस्पेक्ट्रल स्कॅनर या सारख्या विषयांचा समावेश असेल.

ISRO Free Education
इस्रोनं लाँच केलेल्या SSLV-D2 रॉकेटची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये : ISRO

इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याासाठी https://jigyasa.iirs.gov.in/login या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. इथे विचारलेली काही महत्वाची माहिती भरणे आवश्यक आहे. यात विद्यार्थ्यांना वैयक्ती माहितीबरोबर शाळेची माहिती माहिती देखील विचारली जाईल. यात तुमची निवड झाल्यावर अभ्यासक्रम सुरु होण्याची तारीख आणि अभ्यासक्रम तुम्हाला इमेलद्वारा कळवण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.